(Source: ECI/ABP News/ABP Majha)
success story : इस्त्रायला गेला, तंत्रज्ञान शिकून आला; आज कमावतोय लाखोंचा नफा
एका शेतकऱ्याने आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग केले आहेत. या शेतकऱ्याने इस्रायलच्या तंत्रज्ञानानं शेती केली आहे.
success story : शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पन्न घेत आहेत. अशाच एका शेतकऱ्याने आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग केले आहेत. या शेतकऱ्याने इस्रायलच्या तंत्रज्ञानानं शेती केली आहे. आज हा शेतकरी लाखोंचा नफा कमवत आहे. फुलेश्वर महतो असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
इस्रायल हा छोटासा देश असला तरी तंत्रज्ञान, लष्करी सामर्थ्य आणि प्रगत कृषी पद्धती यासाठी तो जगभर प्रसिद्ध आहे. भारत केवळ इस्रायलकडून शस्त्रास्त्रे खरेदी करत नाही, तर इस्त्रायली कृषी तंत्रज्ञानाचाही अवलंब करत आहे. विशेषतः इस्रायली तंत्रज्ञानाने फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळं उत्पादनाबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. आज आपण एका शेतकऱ्याबद्दल बोलणार आहोत. ज्याने इस्रायलला जाऊन शेतीचे प्रशिक्षण घेतले आणि आता पुन्हा आपल्या गावात येऊन शेती करत आहे. त्यामुळे त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. फुलेश्वर महतो असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
फुलेश्वर महतो हे शेतीचे तंत्र शिकण्यासाठी 2017 मध्ये इस्रायलला
भारतीय शेती आणि इस्रायली शेतीमध्ये खूप फरक आहे. इस्रायली शेतकरी शेतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर करत आहेत. तेथे शेतकरी हरितगृहाच्या आत शेती करतात. यामध्ये कोणत्याही हंगामात कोणत्याही भाजीपाल्याची लागवड करणे शक्य आहे. फुलेश्वर महतो हे झारखंडच्या हजारीबाग येथील चऱ्ही येथील रहिवासी आहेत. इस्रायलला जाऊन त्यांनी शेतीचे प्रशिक्षण घेतले. यानंतर ते आता आपल्या गावात येऊन भाजीपाल्याची रोपे तयार करत आहेत. शेतकरी फुलेश्वर महतो सांगतात की, ते शेतीचे तंत्र शिकण्यासाठी 2017 मध्ये इस्रायलला गेले होते. विशेष बाब म्हणजे ICR द्वारे आयोजित इंडिया इस्रायल कृषी प्रकल्पाद्वारे त्यांना इस्रायलला पाठवण्यात आले होते. तेथे त्यांनी शेतीचे आधुनिक तंत्र शिकून घेतले आणि परत येऊन गावात शेती करण्यास सुरुवात केली.
ग्रीन हाऊसमध्ये भाजीपाल्याची रोपे तयार केली
शेतकरी फुलेश्वर महतो सांगतात की, इस्रायलहून परतल्यानंतर त्यांनी पहिले काम केले ते म्हणजे त्यांच्या शेतात ग्रीन हाऊस तयार केले. त्यामध्ये त्यांनी भाजीपाल्याची रोपवाटिका तयार केल्या. पावसाळ्यात 5 लाख बिया पेरुन पहिल्यांदा रोपवाटिका तयार केल्या. यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. रोपवाटिकेत 30 दिवसांत रोपे तयार झाली आहेत.
वर्षाला लाखो रुपयांचा नफा
फुलेश्वर महतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते इस्त्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रीनहाऊसमध्ये रोपवाटिका तयार करत आहेत. ज्यामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी आणि कोबी या भाज्यांचा समावेश आहे. ते भाजीपाल्याची रोपे तयार करून शेतकऱ्यांना विकतात. यातून ते वर्षभरात लाखो रुपये कमावतात.
महत्त्वाच्या बातम्या: