Viral Video : परीक्षेत 60 पैकी 1 गुण, विद्यार्थ्याची प्रतिक्रिया पाहून नेटकरीही आश्चर्यचकित
तुम्ही कधी असा विद्यार्थी पाहिला आहे का ज्या 60 पैकी 1 गुण मिळूनही आनंदाने उत्तरपत्रिका दाखवतो. अशाच एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : खरंतर परीक्षेत अव्वल येण्याचा आनंद विलक्षण असतो. प्रचंड अभ्यास करुन चांगले गुण मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्न करत असतात. चांगले गुण मिळवून सगळ्यांकडून कौतुक करुन घेणं कोणाला आवडत नाही किंवा आवडणार नाही. पण तुम्ही कधी असा विद्यार्थी पाहिला आहे का ज्या 60 पैकी 1 गुण मिळूनही आनंदाने उत्तरपत्रिका दाखवतो. अशाच एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही म्हणाल की भावाला गुणांची अजिबातच पर्वा वाटत नाही. कमी गुण मिळून त्याच्या चेहऱ्यावर थोडीही निराशा किंवा नाराजी दिसत. उलट आनंदाने आणि अभिमानाने तो आपले गुण दाखवत आहे.
हा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे, जो नेटकरी मोठ्या आनंदाने पाहत आहेत. या क्लिपमध्ये विद्यार्थी वर्गात बसलेले दिसत आहेत. तेवढ्यात एक विद्यार्थी वर्गाच्या मागच्या सीटवर बसलेल्या त्याच्या वर्गमित्रांकडे येतो, त्यातील एक मुला व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे. तो आनंदाने त्याची उत्तरपत्रिका कॅमेऱ्याला दाखवतो, त्यावरुन त्याची सर्व उत्तरे चुकीची असल्याचे स्पष्ट होते. परिणामी शिक्षकाने त्याला 60 पैकी एक गुण दिला आहे. या प्रसंगीही त्याचं हसणं आणि उत्साह पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत.
View this post on Instagram
उत्तरपत्रिका दाखवणाऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवर उच्च माध्यमिक विद्यालय, मॅटम असं लिहिलं आहे. म्हणजेच हा व्हिडीओ केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मॅटमचा आहे. या व्हिडीओ क्लिपला आतापर्यंत 28.7 दशलक्षपेक्षा जास्त व्हिव्ज आणि 2.9 दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत. तसंच या व्हिडीओमध्ये शेकडो यूजर्स आपापल्या मित्रांनाही टॅग करुन व्हिडीओ शेअर करत आहेत.