(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Bedi : शार्कचा हेलिकॉप्टवर हल्ला; व्हिडीओ शेअर केल्यामुळे किरण बेदी ट्रोल
Kiran Bedi : भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी आता पुन्हा एकदा ट्रोल झाल्या आहेत.
Kiran Bedi : किरण बेदी (Kiran Bedi) या भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. सध्या किरण बेदी चर्चेत आल्या आहेत. वादग्रस्त ट्वीटमुळे किरण बेदी नेहमीच चर्चेत असतात. किरण बेदी यांनी मंगळवारी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये शार्क हेलिकॉप्टरवर हल्ला करताना दिसत आहे.
किरण बेंदी यांनी हेलिकॉप्टर हमल्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, एका राष्ट्रीय चॅनलने हा व्हिडीओ एक मिलियन डॉलर खर्च करून विकत घेतला आहे. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे किरण बेदी चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.
किरण बेदींनी शेअर केलेला शार्कचा हेलिकॉप्टवर होत असलेल्या हमल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. तसेच व्हॉट्सअॅपवरील विविध ग्रूपमध्येदेखील हा व्हिडीओ शेअर होताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी किरण बेंदीना चांगलेच ट्रोल केले आहे.
Watch this 🥹🥺🙄😳😲 pic.twitter.com/Io0PQb567U
— Kiran Bedi (@thekiranbedi) May 11, 2022
'5 Headed Shark Attack' सिनेमातील व्हिडीओ व्हायरल
किरण बेदी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ 2017 साली प्रदर्शित झालेल्या (5 Headed Shark Attack) या सिनेमातील आहे. पण नेटकरी चुकीच्या पद्धतीने हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. राष्ट्रीय चॅनलनेदेखील हा व्हिडीओ आम्ही विकत न घेतल्याचे स्पष्ट केले आहे. किरण बेदींनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
किरण बेदी यांच्या या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरण बेदींकडून वाहूतक शिस्तिचं पालन होत नसल्यानं, नेटिझन्सनी यावर कमालीची नाराजी व्यक्त केली होती. किरण बेदी नेहमीच वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत येत असतात. त्यांनी मंगळवारी शेअर केलेला शार्कचा हेलिकॉप्टरवर होत असलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकरून आता पुन्हा एकदा किरण बेदींवर नाराजी व्यक्त व्यक्त केली जात आहे.
किरण बेदी याआधी विना हेल्मेट प्रवास केल्यामुळेदेखील ट्रोल झाल्या होत्या. किरण बेदी यांची गाडीवरून फिरताना हेल्मेट न घातलली काही दृश्यं व्हायरल झाली होती. किरण बेदी जेव्हा वाहतूक पोलीस सेवेतमध्ये कार्यरत होत्या, त्यांच्या कार्यकाळात त्या कडक वाहतूक शिस्तीसाठी ओळखल्या जात होत्या.
संबंधित बातम्या