Trending : पायलट आई-मुलाच्या जोडीने विमान उडवत घेतली गगनभरारी! मुलाची आईबद्दल कृतज्ञता व्यक्त; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
Trending News : यंदा सोशल मीडीयावर व्हायरल होत असलेली सर्वात खास पोस्ट म्हणजे पायलट आई आणि तिच्या मुलाचा व्हिडीओ..! एकदा पाहाच..
Trending News : आयुष्यात जर तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण झाल्यावर त्या आनंदाची अनुभूती कदाचित शब्दात वर्णन करता येणार नाही. सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे विमानामध्ये असं काही घडलं की सगळेच कौतुक करू लागले. काय घडले नेमके?
आईसाठी वर्षातील 365 दिवस खास!
मदर्स डे म्हणजे आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...मात्र असे असले तरी आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केवळ एक दिवस पुरेसा नाही. जिने आपल्याला घडवले, तिच्यासाठी 365 दिवस खास आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकांनी हा दिवस आपल्या आईसोबत मोठ्या थाटात साजरा केला, तसेच सोशल मीडियावर फोटोही पोस्ट केले. दरम्यान, यंदा सोशल मीडीयावर व्हायरल होत असलेली सर्वात खास म्हणजे पायलट आई आणि तिच्या पायलट मुलाचा व्हिडीओ देखील खास होता, कारण मुलाने त्याच्या आईसोबत विमान उडवले.
When son becomes co-pilot of mom’s #MothersDay #MothersDay2022 @IndiGo6E #AvGeek pic.twitter.com/gMD1lg9ulu
— Ashoke Raj (@Ashoke_Raj) May 8, 2022
जोपर्यंत तो विमान उडवत नाही, तोपर्यंत विमानात बसणार नाही
इंडिगोच्या पायलटने आपल्या पहिल्या फ्लाइटचे उड्डाण करण्यापूर्वी आपली आई आणि आजीच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि नंतर कॉकपिटकडे परत गेला. प्रदीप कृष्णन असे या पायलटचे नाव असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण होता. यामागे एक खास कारण आहे, कृष्णनच्या आजींनी शपथ घेतली होती की, जोपर्यंत तो विमान उडवत नाही तोपर्यंत त्या विमानात बसणार नाही. यानंतर विमान चेन्नईहून सिंगापूरला रवाना झाले. त्याचा व्हिडीओ पायलटच्या मित्राने शेअर केला आहे, ज्यावर अनेक लोक लाईक करत आहेत आणि आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.
मुलाने आईसोबत विमान उडवले
हा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे, कारण एक पायलट मुलगा मदर्स डेच्या निमित्ताने आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंडिगो कंपनीच्या विमानाचा आहे, सर्वात भावूक गोष्ट म्हणजे पायलट आई आणि मुलगा एकत्र विमान उडवणार होते, त्याआधी मुलाने सर्वांसमोर आईला फुले देऊन आभार मानले.पायलटचे नाव अमन ठाकूर आहे. मदर्स डेच्या निमित्ताने आईसोबत फ्लाइटमध्ये ती को-पायलट असल्याचे तिने सर्वांसमोर सांगितले. तो म्हणाला की वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत तो त्याच्या आईने उडवलेल्या विमानात प्रवासी म्हणून बसायचा आणि आता तो तिच्यासोबत पायलट झाला आहे, त्यामुळे तो खूप आनंदी आहे. या प्रकरणावर लोकांनी टाळ्याही वाजवल्या. या तरुणाने त्यालाआयुष्यात यशस्वी केल्याबद्दल आपल्या आईचे कृतज्ञताही व्यक्त केली. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच पायलट कृष्णनच्या मित्राने 'स्वप्न पूर्ण होतात' असा भावनिक संदेश लिहिला आहे.
व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओला 72 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने सांगितले की, परमेश्वर त्या आई आणि मुलाचे कल्याण करो. याशिवाय एका व्यक्तीने सांगितले की, माता खूप खास असतात, तसेच या भावनिक आणि अभिमानाच्या क्षणासाठी त्यांनी दोघांचेही अभिनंदन केले. दरम्यान, एकाच कुटुंबातील दोन जण एकाच विमानाने कसे उड्डाण करत आहेत, असा प्रश्नही अनेकजण उपस्थित करताना दिसले. हे नियमांच्या विरोधात असल्याचा त्यांचा दावा आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घटनेला अनेकजण फिल्मी ड्रामा म्हणत आहेत.