Viral News : पोलीस हवालदाराचे नशीब पालटले, झाला कोट्यधीश! आईच्या सांगण्यावरून खरेदी केले होते तिकीट
Bumper Lottery Viral News : एका पोलिसाने आपल्या आईच्या सांगण्यावरून 6 रुपयांना लॉटरीचे तिकीट खरेदी केले, त्यानंतर त्याचे नशीब पालटले.
Bumper Lottery: असं म्हणतात की, आईचा आशीर्वाद सोबत असेल तर मुलगा जगातील सर्व सुख मिळवू शकतो. असेच एक उदाहरण समोर आले आहे. पंजाब पोलिसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून तैनात असलेल्या एका पोलिसाने आपल्या आईच्या सांगण्यावरून 6 रुपयांना लॉटरीचे तिकीट खरेदी केले, त्यानंतर त्याचे नशीब पालटले. कुलदीप सिंग नावाच्या हवालदाराला एक कोटींची लॉटरी लागली.
पोलीस हवालदाराचे नशीब पालटले, झाला कोट्यधीश!
एक कोटींची बक्षीस रक्कम जिंकल्यानंतर सामान्य जीवन जगणाऱ्या कुलदीप सिंगची आई आणि त्याचे कुटुंब आनंदी आहेत. पंजाब पोलिसात हवालदार म्हणून तैनात असलेला कुलदीप सिंग हा मुख्यतः राजस्थानमधील श्री गंगानगरचा आहे. पंजाबमध्ये नोकरी निमित्ताने आपलं आयुष्य जगणारे कुलदीप सिंग आणि त्याची आई खूप आनंदी आहेत.
आईच्या सांगण्यावरून लॉटरी लागली!
कुलदीप सिंहने सांगितले की, 6 महिन्यांपूर्वी अचानक एक दिवस त्याची आई बलजिंदर कौरने त्याला लॉटरी खरेदी करण्यास सांगितले. आईला पूर्ण विश्वास होता की लेकाची लॉटरी नक्कीच निघेल. आईने वारंवार विनंती केल्यावर त्याने 6 महिन्यांपूर्वी लॉटरीची तिकिटे खरेदी करण्यास सुरुवात केली. 4 महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांची 6 हजार रुपयांची लॉटरी निघाली, तेव्हा देखील कुटुंब आनंदी होते.
नागालँड राज्याच्या लॉटरीच्या तिकिटाने करोडपती केले
कुलदीपने सांगितले की, तो नेहमी नागालँड राज्य लॉटरीची तिकिटे खरेदी करत असे. त्याचा ड्रॉ दिवसातून तीन वेळा बाहेर येतो. सोडत सकाळी 8, दुपारी 1 आणि 8 वाजता होईल. तो फिरोजपूरहून लुधियानाला यायचा तेव्हा लॉटरीचे तिकीट विकत घेत असे. 2 ऑगस्टलाही त्यांनी असेच केले होते. त्यांनी नागालँड राज्य लॉटरीची 25 तिकिटे खरेदी केली ज्याची किंमत 150 रुपये प्रति तिकीट 6 रुपये होती.
इतर संबंंधित बातम्या