Trending News : एवढी महाग बादली? किंमत ऐकून नेटकरी अवाक्
बादलीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.
Trending News : महागाईच्या काळात सामान्य जनतेच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. काही लोकांच्या घराचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. लोक सध्या बचत करू शकत नाहीत. लोकांचा खर्च इतका वाढला आहे की लोक स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. ज्या वस्तूंचा रोज वापर होईल, अशा वस्तू खरेदी करताना अनेक लोक किंमतीचा जास्त विचार करत नाही. कारण त्या वस्तूचा वापर ते रोज करत असतात. अंघोळीसाठी वापरण्यात येणाऱ्या बादलीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमधील या बादलीची किंमत ऐकून लोक थक्क झाले आहे.
अनेक लोक वेगवेगळ्या अॅप्सचा वापर करुन ऑनलाइन पद्धतीनं वस्तू ऑर्डर करत असतात. अनेक वेळा ऑनलाइन अॅप्सवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंमतींवर डिस्काउंट दिले जाते. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बादलीच्या किंमतीवर डिस्काउंट देऊन देखील ही एवढी महाग बादली कोणी खरेदी करेल की नाही? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
जाणून घ्या बादलीची किंमत
एका ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर ही गुलाबी रंगाची बादली खूप महाग किंमतीमध्ये विकली जात आहे. या बादलीची किंमत 35900 रुपये आहे. या बादलीवर 28 टक्के डिस्काउंट देईल देण्यात आले आहे. डिस्काउंट देऊन देखील या बादलीची किंमत 25999 रुपये होते. ही बादली EMI वर घेण्याचा पर्याय देखील या अॅपनं ग्राहकांना दिला आहे. सोसल मीडियावर व्हायरल झालेल्या या बादलीची किंमत ऐकून अनेक नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.
View this post on Instagram
हेही वाचा :