Optical Illusion: Petro च्या गर्दीत लपला आहे एक वेगळा शब्द; 10 सेकंदात शोधून दाखवा
Brain Teaser: ही ऑप्टिकल इल्युजनची टेस्ट खूप मजेदार आहे. यात तुम्हाला Petro असे शब्द दिसत आहेत, याच गर्दीत एक वेगळा शब्द देखील लपला आहे, जो तुम्हाला 10 सेकंदात शोधायचा आहे.
Optical Illusion Image: 'ऑप्टिकल इल्युजन' (Optical Illusion) हा आता अगदी सामान्य शब्द झाला आहे. आपण लहानपणी पेपरमध्ये, पुस्तकांमध्ये (Books) कोडी (Puzzles) सोडवायचो, आता हीच कोडी ऑनलाईन आली आहेत. या कोड्यांना ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. या कोड्यांची उत्तरं (Answers) शोधणं खूप कठीण असतं. यात कधी आपल्याला एखादी वस्तू शोधायची असते, तर कधी दोन चित्रांमधील फरक ओळखायचा असतो. मेंदूचा व्यायाम (Brain Exercise) करण्यासाठी आपण अशा प्रकारची कोडी रोज सोडवायला हवी.
ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूला (Brain) चालना मिळते, डोकं वेगाने चालतं. दिलेली चित्रं सोडवताना कस लागतो. मेंदूची परीक्षा घेतली जाते. विशेष म्हणजे दिलेल्या वेळेत ही कोडी सोडवणं चॅलेंजिंग असतं. यात वेगवेगळ्या प्रकारची चित्रं असतात. ही चित्रं व्यक्तीला गोंधळवून टाकतात. ज्याचं निरीक्षण कौशल्य चांगलं असतं त्यालाच हे उत्तर सापडतं. सध्या ऑप्टिकल इल्युजन इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. असंच एक ऑप्टिकल इल्युजन आज पाहूया.
हे कोडं नेमकं सोडवायचं कसं?
आता वरती दिलेल्या चित्रावर एक नजर टाका. तुम्हाला यात 'Petro' शब्दाची माळ दिसेल. पण या 'Petro' शब्दाच्या गर्दीत 'Retro' शब्द देखील लपलेला आहे. हाच 'Retro' शब्द शोधण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत.
सापडला का?
तुम्हाला 'Retro' शब्द शोधताना याठिकाणी त्याच्या स्पेलिंगवर फोकस करायचं आहे. तुम्हाला हा शब्द सापडला का? सापडला असेल तर अभिनंदन! तुमची निरीक्षण शक्ती चांगली आहे. जर तुम्हाला हा शब्द सापडला नसेल, तर काळजी करू नका; आम्ही तुम्हाला मदत करू. यासाठी खाली आम्ही या प्रश्नाचं उत्तर दाखवत आहोत.
जे लोक सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असतात त्यांना ऑप्टिकल इल्युजन म्हणजे नेमकं काय? हे माहीत असतं. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित अनेक चित्रदेखील पाहायला मिळतात. ऑप्टिकल इल्युजन हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात, आपण जे पाहतो ते प्रत्यक्षात नसतं आणि जे घडतं ते सहजासहजी दिसत नाही. एका संशोधनात ऑप्टिकल इल्युजन व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठी सुद्धा उपयोगात येत असल्याचं सांगितलं गेलं आहे, ज्याला ब्रेन टिझर सुद्धा म्हटलं जातं.
हेही वाचा:
VIDEO: 'आय ड्रॉप' समजून चुकून डोळ्यात टाकला 'गम'; बेतलं महिलेच्या जीवाशी, पुढे काय झालं ते पाहाच