एक्स्प्लोर

Most Poisonous Ruler : जगातील सर्वात विषारी शासक, दररोज जेवणातून करायचा विषप्राशन, राजा मोहम्मद बगदाच्या शरीरावर बसलेली माशीही जिवंत रहात नसे, 'ही' रंजक कहाणी माहितीय?

Sultan Mahmud Begada : एकदा शत्रूने कट रचून राजा मोहम्मद बगदा याला मारण्यासाठी जेवणातून विष पाजलं होतं. या कटातून तो बचावला पण यापुढे विषबाधा होऊ नये म्हणून त्यानं टोकाचं पाऊल उचललं.

Sultan Mahmud Begada or Mahmud Shah I : इतिहासात असे अनेक राजे (King) होऊन गेले, ज्यांच्याबद्दल फार रंजक गोष्टी सांगितल्या जातात. काही गोष्टींची कल्पना करणं जवळजवळ अशक्य आहे. अनेक राजे युद्धामधील त्यांची अतुलनीय कामगिरी आणि शौर्यामुळे इतिहासात अमर झाले. काही शासकांच्या शौर्याची, तर कुणाच्या भ्याडपणाच्या कथा प्रचलित आहेत. अशाच एका शासकाबाबत काही रंजक गोष्टी जाणून घ्या. हा मोगल शासक दररोज जेवणातून विषप्राशन करायचा. मुघल शासक शासक 'मोहम्मद बगदा' हा 'महमूद बेगडा' या नावानेही ओळखला जातो. हा राजा 

इतिहासातील सर्वात विषारी शासक 'मोहम्मद बगदा'

मुघल शासक सुलतान मोहम्मद बगदा याला इतिहासातील सर्वात विषारी शासक म्हटलं जातं. महमूद बगेडा या नावाने हा राजा प्रसिद्ध आहे. मोहम्मदच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याच्या सवयी फार वेगळी आणि विचित्र होती. सामान्य माणसाच्या तुलनेने या सवयी फार भयानक म्हटलं आहे. त्याचे नातेवाईक आणि जवळचे मित्रही त्याला घाबरायचे. महमूद बगेडा उर्फ महमूद शाह (पहिला), याच्याकडे वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी गुजरातची गादी आली. त्यानंतर त्याला लोक मोहम्मद बगदा उर्फ महमूद बगेडा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याने वयाच्या 52 व्या वर्षापर्यंत गुजरातवर राज्य केलं.

दररोज जेवणातून करायचा विषप्राशन

सुलतान मोहम्मद बगदा दररोज जेवणातून करायचा विषप्राशन करत असे. प्रचलित कथांनुसार, त्याच्या शरीरावर बसलेली माशीही जिंवत राहत नसे, कारण त्याच्या शरीरात विष होतं. त्याने लहानपणापासूनच दररोज जेवणातून विषप्राशन करण्यास सुरुवात केली. दररोज विष सेवन केल्यामुळे त्याचं शरीर अत्यंत विषारी झालं होतं, यामुळे त्याचा शरीरावर माशी जरी बसली तरी विषबाधेमुळे ती माशीही जिवंत राहत नसे. 

'हे' आहे विष पिण्याचं कारण

प्रचलित कथांनुसार सांगितलं जातं की, फार लहान वयात सत्ता हाती आल्यामुळे शत्रूने शासकाची गादी मिळावी यासाठी मोहम्मद बगदाला टक रचून मारण्याचा प्रयत्न केला. एकदा शत्रूने कट रचून राजा मोहम्मद बगदा याला मारण्यासाठी जेवणातून विष पाजलं होतं. या कटातून तो बचावला पण त्यानंतर त्याने ठरवलं की, यापुढे विषबाधा होऊ नये म्हणून त्यानं टोकाचं पाऊल उचललं. त्यानं स्वत:वर विविध प्रयोग करून विषबाधेपाासून बचाव करण्याचं ठरवलं. यासाठीच त्याने दररोज जेवणातून थोड्या-थोड्या प्रमाणात विषप्राशन करायला सुरुवात केली. यामुळे त्याच्या शरीरावर विषबाधेचा परिणाम होणार नाही, असा त्याचा समज होता.

मोहम्मद बगदाने लहानपणापासूनच अन्नासोबत विष प्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचं शरीर विषारी बनलं. विषबाधेने आपला मृत्यू होऊ नये यासाठी राजाने ही विचित्र सवय लावली होती. या राज्यासोबत संबंध ठेवणाऱ्या स्त्रियांचाही विषबाधेने मृत्यू झाला, असंही सांगितलं जातं. पोर्तुगीज प्रवासी बाबोसा याच्या 'द बुक ऑफ ड्युरेट बाबोसा खंड 1' या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

35 किलो अन्न खायचा बगदा

मोहम्मद बगदा खवय्या होता, त्याला जेवणाची खूप आवड होती. तो एका वेळी भरपूर अन्न खात असे. बगदा एका वेळी सुमारे 100 केळी खायचा. तर नाश्त्यात अनेक वाट्या मध आणि लोणी खात असे. त्यांच्या पलंगाच्या शेजारी अनेक खाद्यपदार्थ ठेवण्यात यायचे, ज्यामुळे कधीही भूक लागल्यावर त्याला खाता यायचं. मोहम्मद बगदा दररोजचा सुमारे 35 किलो अन्न खायचं असं सांगितलं जातं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fact Check : एमएस धोनी पर्स घरी विसरला, 600 रुपयांची केली मागणी, नेमकं सत्य काय ?
Fact Check : एमएस धोनी पर्स घरी विसरला, 600 रुपयांची केली मागणी, नेमकं सत्य काय ?
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमकं कारण काय ?
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमकं कारण काय ?
EVM-VVPAT verification : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Loksabha Election 2024 : आधी लगीन लोकशाहीचा! लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदान केंद्रावर पाऊलHello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा 26 एप्रिल 2024Lok Sabha 2024 : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं, दुसऱ्या टप्प्यात देशात 64.23 टक्के मतदान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fact Check : एमएस धोनी पर्स घरी विसरला, 600 रुपयांची केली मागणी, नेमकं सत्य काय ?
Fact Check : एमएस धोनी पर्स घरी विसरला, 600 रुपयांची केली मागणी, नेमकं सत्य काय ?
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमकं कारण काय ?
24.75 कोटींच्या खेळाडूला कोलकात्यानं बेंचवर बसवलं, नेमकं कारण काय ?
EVM-VVPAT verification : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; नेमका काय बदल झाला आणि काय बदललं नाही?
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
एक लव्हस्टोरी अशीही... तहानलेल्या महावताला हत्तीने पाजलं पाणी, कलमापूरच्या हापश्यावरील व्हायरल कहाणी
Shirdi Lok Sabha :एकनाथ शिंदेंची शिर्डीत स्नेहलता कोल्हेंसोबत चर्चा, सदाशिव लोखंडेंच्या प्रचाराबाबतचा सस्पेन्स कायम, तिढा कधी सुटणार?
सेनेतील बंडात साथ देणाऱ्या लोखंडेंसाठी मुख्यमंत्री मैदानात, एकनाथ शिंदेंची स्नेहलता कोल्हेंशी चर्चा, तिढा कधी सुटणार?
Brij Bhushan Singh : लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्रिजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
बृजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
Nilesh Lanke : सेम टू सेम नावांचा पॅटर्न नगरमध्ये, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार,  म्हणाले पैशाच्या बळावर डमी उमेदवार उभा कराल पण...
केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी, जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी, निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला
Vishal Patil : तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
Embed widget