World : फक्त पायांचा फोटो अपलोड करुन लाखो रुपये कमवते 'ही' महिला; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Trending News : एकेकाळी ब्रिटनमध्ये नर्स (Nurse) म्हणून काम करणारी महिला आता तिच्या सुंदर पायांमुळे दरमहा लाखो रुपये कमवत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
United Kingdom : सोशल मीडिया हे जगभर पसरलेलं जाळं आहे. इथे कधी कोण कसा अचानक प्रसिद्ध होईल याचा अंदाज नसतो. लोक चित्रविचित्र गोष्टी करुनही महिनाभरात लाखो रुपये कमवतात. असंच काही ब्रिटनमधील एक महिला देखील करत आहे. ही महिला महिनाभरात लाखो रुपये कमवत आहे. लंडनमध्ये राहणारी 28 वर्षीय एमिलिया सांगते की, ती केवळ तिच्या सुंदर पायांच्या काही फोटो पोस्ट करुन लाखो रुपये कमवते. त्यामुळेच ती तिच्या पायाचीही विशेष काळजी घेते.
पैसे कमवण्यासाठी एमिलिया तिच्या पायांची विशेष काळजी घेते. तिच्या पायावर एकही डाग दिसणार नाही, याची ती काळजी घेते. ती सांगते की, तिचे पाय सुंदर दिसले तर त्यांना पाहण्यासाठी लोक बरेच पैसे देखील खर्च करतात. हे सर्व सुरू झालं एका वेबसाईटमुळे. एमिलियाला 'फन विथ फीट' नावाच्या वेबसाइटबद्दल माहिती मिळाली, जी पायांच्या सुंदर फोटोंच्या बदल्यात पैसे देते. त्यानंतर एमिलियाने तेथे फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली.
सहा महिन्यांच्या आत सुरू झाली चांगली कमाई
एमिलियाने सांगितलं की, ती एकेकाळी ब्रिटनमध्ये नर्स म्हणून काम करत होती. पण जेव्हा तिला सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मबद्दल समजलं, त्यावेळी तिने तिथेच आपलं करिअर बनवण्याचा विचार केला. तिच्या म्हणण्याप्रमाणे, तिला सुरुवातीच्या काही दिवसांतच समजलं होतं की, या प्लॅटफॉर्मवर जास्त पैसे मिळू शकतात. सहा महिन्यांच्या आत हजारो लोकांनी तिच्या पायाचे सुंदर फोटो पाहून तिला पैसे पाठवण्यास सुरुवात केली. एमिलिया फक्त आपल्या पायाचे सुंदर फोटो काढून सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्वर पोस्ट करते.
नक्की किती पैसे कमवते एमिलिया?
लंडनच्या या कंटेंट क्रिएटरचं म्हणणं आहे की, तिचा कंटेट फक्त याच कारणासाठी बहुचर्चित आहे, कारण तिने आपल्या पायांना सुंदर बनवण्यासाठी काय-काय केलं हे नेहमी सांगते. एमिलिया म्हणाली की, तिच्या चाहत्यांना तिच्याकडून काय हवं आहे, हे तिला माहीत आहे. हे सर्व करून ती महिन्याला 5 हजार पौंड, म्हणजेच सुमारे 5 लाख रुपये कमावते. एमिलियाने असंही सांगितले की, काही लोक तिला विचित्र प्रकारच्या विनंती देखील करतात, जसं की लोशनमध्ये पाय बुडवून त्यांचं नाव घेणं, त्यासाठी देखील ते तिला पैसे देतात.
हेही वाचा: