Largest District : भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? एकेकाळी राज्य होता 'हा' जिल्हा!
Largest District: भारतात किती राज्य आहेत? हे कदाचित तुम्हाला माहित असेल. पण भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता हे तुम्हाला माहित आहे का? कधीकाळी हा जिल्हा म्हणजे एक वेगळं राज्यच होतं.
Largest District: भारतात 28 राज्ये (States) आणि 8 केंद्रशासित प्रदेश (Union Territories) आहेत. या राज्यातील प्रशासन सुकर चालावं यासाठी त्याला छोट्या भागांत विभागण्यात आलं आहे, ज्याला आपण जिल्हा म्हणतो. जेव्हा एखाद्या जिल्ह्यवर लक्ष ठेवणं जोखीमीचं जातं किंवा प्रादेशिक विविधतेमुळे जिल्हा विभागण्याची गरज वाटते, त्यावेळी एका जिल्ह्याचे दोन तुकडे देखील पडतात. तसाच काहीसा प्रकार आपल्या देशात होत असतो आणि गरज पडल्यास नवीन जिल्हे बनत असतात.
असाच काहीसा प्रकार देशातील एका राज्यात घडला. मूळचं राज्य असलेल्या क्षेत्राचं रुपांतर जिल्ह्यात झालं आणि त्यामुळेच त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक आहे. पण देशातील हा जिल्हा नेमका कोणता? असा प्रश्न कधी तुम्हाला कधी पडला आहे का? याच रंजक गोष्टीबद्दल जाणून घेऊया.
'या' जिल्ह्याच्या अर्ध्या भागात वाळवंटी प्रदेश
भारतातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचं नाव कच्छ आहे, हे गुजरातमध्ये (Gujarat) वसलेलं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा सर्वात मोठा जिल्हा असल्याचं सांगितलं जातं. गुजरातच्या या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ 45,674 चौरस किलोमीटर आहे, जे एकट्या महाराष्ट्र राज्याचा 23.7 टक्के भाग व्यापते. या जिल्ह्याचा निम्म्याहून अधिक भाग हा वाळवंटी प्रदेश आहे, जो गुजरातमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. पर्यटक उंट सफारीचा आनंद घेण्यासाठी कच्छला हजेरी लावतात.
एकेकाळी जिल्ह्याच्या नावाने होतं राज्य
एकेकाळी भारतात कच्छ नावाचं राज्य होतं. ही गोष्ट आहे 1950 सालची, जेव्हा हा जिल्हा राज्य म्हणून नावारुपास होता. 1 नोव्हेंबर 1956 रोजी हा परिसर मुंबई राज्याला जोडण्यात आला. त्यावेळी मराठी आणि गुजराती लोक तिथे राहत होते आणि त्यात काही मारवाडी लोकांचीही संख्या होती. त्यानंतर 1960 मध्ये भाषेच्या आधारावर मुंबई राज्याचं विभाजन झालं, मुंबईचं विभाजन करुन महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन नवीन राज्यं निर्माण करण्यात आली. कच्छ जिल्हा नंतर गुजरातमध्ये आला आणि मुंबई हा जिल्हा महाराष्ट्रात आला.
कच्छचे रण पर्यटकांचं आकर्षण
गुजरातमधील कच्छचे रण गांधीधामपासून 108 किलोमीटर अंतरावर आहे. हा प्रदेश सुमारे 26 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर व्यापला आहे. रण म्हणजे मिठाचे दलदल. हा वाळवंटासारखा दिसणारा प्रदेश पांढऱ्या मिठाने आच्छादलेला आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणचे सौंदर्य बघण्यासारखे असते. कच्छचे रण दिवसा इतके पांढरे दिसते की जणू जमीन आणि आकाश एक झाल्याचा भास होतो. तर रात्रीच्या अंधारात पूर्ण चंद्राच्या प्रकाशात किंवा पौर्णिमेच्या रात्री मिठाची जमीन चकाकणारी दिसते.
हेही वाचा:
Brass City: भारतातील 'या' शहराला म्हणतात पितळ नगरी; अमेरिकेपासून युरोपपर्यंत येथील वस्तूंना मागणी