Trending : समुद्र किनारी मज्जा करण्यासाठी गेलेले तिघे एका कुटुंबातील जण बुडाले, दोघांचा मृत्यू
Indian Family Drowns at Oman Beach : पावसाळ्यात समुद्र किनारी मजा-मस्ती करणं जीवावर बेतू शकते. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर सुट्टीसाठी गेलेले तिघे जण बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Indian Family Drowns at Oman Beach : पावसाळ्यात समुद्र किनारी मजा-मस्ती करणं जीवावर बेतू शकते. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर सुट्टीसाठी गेलेले तिघे जण बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावेळी एका भारतीय कुटुंबातीलही तिघे जण बुडाल्याची माहिती आहे. समुद्र किनारी लाटेसोबत मज्जा करण्याचा आनंदाच्या भरात लोक सुरक्षेबाबत विसरले. लाटेच्या जोरदार तडाख्यासह आठ जण पाण्यात बुडाले. याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ओमान समुद्र किनाऱ्यावरील (Oman Sea Beach) दुर्घटनेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये समुद्राची जोरदार लाटेमध्ये किनाऱ्यावरील दोन जण प्रवाहासोबत बुडताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये खवळलेला समुद्र दिसत आहे. काही लोक सेल्फी, व्हिडीओ काढताना दिसत आहेत. यावेळी जोरदार लाट येते आणि यामध्ये किनाऱ्यावरील एक मुलगा आणि मुलगी वाहून जाते. यावेळी त्यांचे वडील त्यांना वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी मारतात.
Your "Life" is more important than your "Likes". pic.twitter.com/3XNjyirbwJ
— Dipanshu Kabra (@ipskabra) July 13, 2022
या दुर्घटनेत 42 वडील शशिकांत महामाने (वय 42 वर्ष) आणि सहा वर्षीय मुलगा याचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, अद्याप नऊ वर्षीय मुलगी बेपत्ता असून तिचा शोध सुरु आहे. हे भारतीय कुटुंब मूळचं सांगलीचे असून सध्या दुबईमध्ये राहत होते. शशिकांत महामाने पत्नी आणि मुलांसह सुट्ट्यांसाठी ओमान येथे आले होते. पावसाळ्यात मजा करा मात्र, जीवाची काळजी घ्या.
IPS अधिकाऱ्यांनी व्हिडीओ केला ट्विट
हा व्हायरल झालेला हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबडा (IPS Dipanshu Kabra) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्या या व्हिडीओसोबत कॅप्शन दिलं आहे की, 'तुमचं आयुष्य ''लाईक्स''पेक्षा अधिक मोलाचं आहे.' या व्हिडीओ आतापर्यंत सुमारे दोन लाख जणांनी पाहिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या