Viral Video : वाघासोबत बोटीतून फिरताना दिसली महिला, व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Trending Video : सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा वाघासोबत बोटीवर प्रवास करतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Trending Video : वाघाचा समावेश जंगलातील सर्वाधिक हिंस्र प्राण्यांमध्ये केला जातो. केवळ इतर प्राणीचं नाही तर मनुष्यही वाघापासून दूर राहणेचं पसंत करतो. वाघ समोर जरी आला तरी लोकांचा थरकाप उडतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा वाघासोबत बोटीवरून प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आजकाल प्रत्येकाला पाळीव प्राणी पाळण्याची आवड आहे, ती पूर्ण करण्यासाठी बरेच लोक कुत्रे, मांजर तसेच ससे किंवा इतर प्रकारचे प्राणी किंवा पक्षी पाळताना दिसतात. सिंह, वाघ यांसारख्या वन्य प्राण्यांना पाळण्याचा आपण विचारही करत नाही. सिंह किंवा वाघाला पाळण्याचा विचार केला, तर आपल्याला अरब देश आणि तेथे राहणारे शेख आठवतात.
सध्या मात्र एक महिला चक्क वाघ पाळताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे पाहून यूजर्स चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत. सहसा असे वन्य प्राणी पाहून कोणत्याही सामान्य माणसाला घाम फुटतो आणि आपण अशा प्राण्यांना पाळण्याचा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही.
View this post on Instagram
इंस्टाग्रामवर mokshabybee_tigers नावाच्या अकाऊंटवर एक महिला तिच्या अनेक जंगली साथीदारांसोबतचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते. यामहिलेने अनेक वन्य प्राणी पाळले आहे. यामध्ये सिंह, वाघ, चिंपांझी आणि बिबट्या तसेच हायनासोबत खेळताना व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. नुकताच एका महिलेचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती वाघासोबत बोटीवर फिरताना दिसत आहे.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिला एका छोट्या बोटीवर वाघासोबत बसलेली दिसत आहे, ती महिला पॅडलच्या मदतीने बोट चालवत आहे. यावेळी वाघ बोटीवर झोपलेला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हांलाही विश्वास बसणार नाही.हा व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत दोन लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. यूजर्स व्हिडीओवर कमेंट करत आश्चर्य व्यक्त करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या