Fuel consumption : एक लिटर तेलात विमान किती अंतर पार करतं? जाणून घ्या विमानाचं मायलेज किती असतं
Fuel consumption : टोकियो आणि न्यूयॉर्क शहरादरम्यान सुमारे 13 तासांच्या उड्डाणासाठी, बोईंग 747 विमान सुमारे 1,87, 200 लिटर इंधन वापरते.
Fuel consumption : जेव्हा आपण बाईक किंवा कार खरेदी करतो तेव्हा त्याच्या सर्व वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, त्या वाहनाच्या मायलेजबाबतही माहिती मिळवतो. म्हणजेच एक लिटर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये ते वाहन किती किलोमीटर प्रवास करू शकते याचा आपण अंदाज घेतो. प्रवासाचा खर्च प्रामुख्याने वाहनात वापरल्या जाणाऱ्या इंधनावर अवलंबून असतो. त्यामुळे इंधनाचे दर वाढले की भाडेही वाढते. विमान हेही वाहतुकीचं साधन आहे. विमान चालवण्यासाठीसुद्धा इंधनाची गरज लागते. मात्र विमानातील इंधन हे पेट्रोल-डिझेलपेक्षा वेगळे आहे. अशा परिस्थितीत हे महाकाय विमान एका लिटरमध्ये किती अंतर पार करते? विमानाचे मायलेज किती असते? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. तर याच संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
बोईंग 747 विमान किती इंधन खर्च करतं?
विमानाचा इंधन वापर जाणून घेण्यासाठी आपण सर्वात मोठ्या बोइंग 747 विमानांबद्दल जाणून घेऊयात. या विमानाचा सरासरी वेग ताशी 900 किलोमीटर आहे, ज्यामध्ये सुमारे 500 प्रवासी प्रवास करू शकतात. मिळालेल्या अहवालानुसार, बोइंग विमान प्रति सेकंद सुमारे 4 लिटर इंधनाचा वापर होतो. त्यानुसार एका मिनिटाच्या प्रवासासाठी 240 लिटर इंधन लागते. अशी विमाने एक लिटर इंधनात सुमारे 0.8 किलोमीटर अंतर पार करतात.
प्रति तास 'इतके' इंधन खर्च होते
एक बोईंग 747 विमान एका किलोमीटरमध्ये सुमारे 12 लिटर इंधन वापरते. बोइंगशी संबंधित एका वेबसाईटनुसार, बोइंग 747 विमान दर सेकंदाला एक गॅलन म्हणजेच सुमारे 4 लिटर इंधन खर्च करते. हे विमान प्रति मैल सुमारे 5 गॅलन इंधन वापरते. याचाच अर्थ सुमारे 12 लिटर प्रति किलोमीटर. त्याच वेळी, एअरबस A32 विमान प्रति सेकंद 0.683 लिटर इंधन वापरते. एक बोइंग विमान ताशी 14,400 लिटर इंधन वापरते.
टोकियो आणि न्यूयॉर्क शहरादरम्यान सुमारे 13 तासांच्या उड्डाणासाठी, बोईंग 747 विमान सुमारे 187 ते 200 लिटर इंधन वापरते. या विमानात 568 लोक प्रवास करू शकतात. बोईंग 747 विमान हे मालवाहतूक आणि मोठे व्यावसायिक विमान आहे. याला जंबो जेट किंवा 'क्वीन ऑफ द स्काय' असेही म्हणतात. विमानातील इंधनाला एअरक्राफ्ट टर्बाइन इंधन (ATF) म्हणतात.
महत्त्वाच्या बातम्या :
Trending News : स्वीडिशची मुलगी युपीच्या मुलाच्या प्रेमात; लग्न करण्यासाठी स्वीडनवरून आली भारतात