एक्स्प्लोर

देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्थानक! 5 स्टार हॉटेलप्रमाणे दिसते इमारत; जागतिक दर्जाच्या सुविधा

First Private Railway Station : देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन मध्य प्रदेशात बनवण्यात आलं आहे. हे एखाद्या 5 स्टार हॉटेलप्रमाणे दिसतं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

Madhya Pradesh Habibganj Railway Station : देशात सध्या सर्वच बाबतील आधुनिकीकरण होताना दिसत आहे. रेल्वे सेवाही यामध्ये मागे नाही. नागरिकांचा प्रवास सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही आधुनिकीकरणावर भर दिला जात आहे. मेट्रो, मोनो नंतर देशात सुस्साट धावणार वंदे भारत ट्रेनही सुरु झाली आहे. इतकंच नाही तर देशात आता जागतिक सुविधा असलेलं खाजगी रेल्वे स्थानकही (First Private Railway Station) उभारण्यात आलं आहे.

देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्थानक

जागतिक दर्जाच्या सुविधा असलेलं देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्थानक (First Private Railway Station in India) उभारण्यात आलं आहे. देशातील हे पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन मध्य प्रदेशात आहे. हे रेल्वे स्थानक सरकारने 45 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिलं आहे. देशातील हे पहिलं खाजगी स्टेशन एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखे दिसतं. 

भारतातील पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन

देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन हबीबगंज आहे, हे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आहे. 2021 मध्ये या स्टेशनचे नाव हबीबगंज (Habibganj) ऐवजी बदलून राणी कमलापती रेल्वे स्टेशन (Rani Kamlapati Railway Station) करण्यात आलं होतं. IRDC (Indian Railways Development Corporation) ने दिलेल्या माहितीनुसार, हे रेल्वे स्थानक सरकारसोबत खाजगी कंपनीने भागीदारी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित केलं गेलं आहे.

कोणत्या कंपनीकडे या स्थानकाचं काम

मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय रेल्वेने बन्सल समुहासोबत (Bansal Group) करार करून हे रेल्वे स्टेशन विकसित करण्याची जबाबदारी दिली होती. स्थानकाच्या उभारणीसोबतच आठ वर्षांच्या देखभाल आणि संचालनाची जबाबदारीही बन्सल ग्रुपवर आहे. रिपोर्टनुसार, हे स्टेशन 45 वर्षांसाठी कंपनीने भाडेतत्वावर घेतलं आहे. बन्सल समूह या विकासासाठी 100 कोटी रुपये खर्च करेल. या सोबतच स्टेशनच्या आजूबाजूचा परिसरही बन्सल समुहाने भाडेतत्त्वावर घेतला असून त्यासाठीही कंपनी कोट्यवधी खर्च करणार आहे. 

रेल्वे स्थानकावर जागतिक दर्जाच्या सुविधा

या रेल्वे स्थानकावर शॉपिंग स्टोअर्स, रेस्टॉरंट्स, केटरिंग शॉप्स आणि पार्किंग इत्यादी अनेक प्रकारच्या सुविधा देखील समाविष्ट आहेत. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र सुविधाही आहेत. या स्थानकावर ऊर्जेसाठी सोलर पॅनलही बसवण्यात आले असून, त्यातून मिळणारी ऊर्जा स्थानकाच्या कामांसाठी वापरली जाणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुविधा

मीडिया रिपोर्टनुसार, कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना 4 मिनिटांत स्टेशनबाहेर काढता येईल, अशा प्रकारे हे स्टेशन बनवण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

विमानात परफ्यूम आणि डियोड्रंट नेण्यास मनाई, काय आहे यामागचं कारण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget