Trending News : वृद्ध व्यक्तीच्या कलेचं सर्वत्र होतंय कौतुक; मन जिंकतोय व्हिडीओ
Trending News : सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती उत्तम प्रकारे वाद्य वाजवताना दिसत आहे.
Trending News : जगभरात टॅलेंटची कुठेच कमतरता नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. जे पाहून यूजर्स आश्चर्यचकित होतात. याच व्हिडीओमध्ये काही लोकांचं टॅलेंट हृदयाला भिडणारं असतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
सध्या सोशल मीडियावर असाच एक वयस्कर व्यक्ती आपल्यातील टॅलेंटने लोकांची मनं जिंकतोय. या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती उत्तम प्रकारे एक वाद्य वाजवताना दिसत आहे. इकतारा असं या वाद्याचं नाव असून तो ते उत्तम प्रकारे वाजवताना दिसतोय. हे वाद्य भजन किंवा संगीतासाठी वापरले जाते.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
लोकांची मनं जिंकली
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ किरण नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ही वृद्ध व्यक्ती हातात इकतारा घेऊन उभी दिसत आहे. ही वृद्ध व्यक्ती इकतारा या वाद्यातून 'चाहा है तुझको, चाहूंगा हर पल' या गाण्याची धून वाजवताना दिसते. या इकतारामधून येणारी ट्यून यूजर्सच्या हृदयाला भिडली आहे.
व्हिडीओ होतोय वेगाने व्हायरल
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही वेळातच 14 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स सतत तो शेअर करताना आणि त्यावर प्रतिक्रिया देताना दिसतात. बर्याच यूजर्सने त्याचे सर्वोत्तम प्रेझेंटेशन म्हणून वर्णन केले आहे.
महत्वाच्या बातम्या :