(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Treding News : गुटखा खा अन् पुरस्कार मिळवा'; भन्नाट जाहिरातीचा फोटो होतोय व्हायरल, IAS अधिकाऱ्यांकडून कौतुक
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी या जाहिरातीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
Treding News : गुटखा हा आरोग्यासाठी हानिकारक असतो, हे माहित असूनही अनेक लोक गुटखा खात असतात. लोकांनी गुटखा खाऊ नये यासाठी अनेक जाहिरातींमधून जनजागृती केली जाते. पण आता नुकताच एका हटके जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये 'गुटखा खावा आणि पुरस्कार मिळवा'असं लिहिलेलं दिसत आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी या जाहिरातीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन अवनीश यांनी 'चांगली आयडिया आहे', असं कॅप्शन दिलं आहे.
अवनीश शरण यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एका भिंतीवर 'गुटखा खा आणि पुरस्कार मिळवा' ही जाहिरात दिसत आहे. तसेच एक पेंटर हातामध्ये रंगाची बाटली धरुन उभा राहिलेला दिसतोय. जाहिरातीमध्ये लिहिलेल्या वाक्यांनी अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
'गुटखा खा आणि पुरस्कार मिळवा' या योजनेची माहिती या जाहिरातीमध्ये लिहिलेलं दिसत आहे. गुटखा खाल्यानंतर मिळणारा प्रथाम पुरस्कार हा 'कॅन्सर' आहेस असं देखील या जाहिरातीमध्ये लिहिलं आहे. दुसरा पुरस्कार, तिसरा पुरस्कार, चौथा पुरस्कार आणि पाचवा पुरस्कार या पुरस्कारांची माहिती या ट्वीटमध्ये माहिती देण्यात आली आहे.
बढ़िया आइडिया. pic.twitter.com/VibFwg56nT
— Awanish Sharan (@AwanishSharan) May 13, 2022
या भन्नाट योजनेसाठी फॉर्म जर कोणत्या व्यक्तीला भरायचा असेल तर पानच्या दुकानामध्ये हे फॉर्म मिळतील, असं त्या जाहिरातीमध्ये लिहिण्यात आलं आहे. योजनेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे हे यमराज असणार आहेत, असं या जाहिरातीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या