एक्स्प्लोर

साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला

पाटण येथील ह्या प्रकल्पामुळे वृक्षांची तोड होत असून पर्यावरणास हानीकारक प्रकल्प असल्याचे सांगत विरोध वाढत आहे.

सातारा : एकीकडे कर्जत-भीमाशंकरमधील टोरेंट प्रकल्पाला विरोध वाढत असताना दुसरीकडे साताऱ्याच्या पाटण (Satara) तालुक्यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्पावरुनही चांगलाच वाद पेटला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेताच प्रकल्पाचे काम सुरू केल्याचा ठपका ठेवत पाटण वनविभागाने (Forest) 13 नोव्हेंबर रोजीच अदानी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीदाराला नोटीस बजावत काम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश देण्यात आले आहेत. रोहन भाटे यांच्या तक्रारीनंतर हा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे.

पाटण येथील ह्या प्रकल्पामुळे वृक्षांची तोड होत असून पर्यावरणास हानीकारक प्रकल्प असल्याचे सांगत विरोध वाढत आहे. त्यातच, 15 नोव्हेंबर रोजी अभिनेते सयाजी शिंदे आणि प्रकल्पविरोधी लढ्याचे युवक आंदोलक विवेकानंद पाटील यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देत पाहणी केली. हे काम अनधिकृत असल्याचा आरोप करत त्यांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. त्यामुळे तारळी प्रकल्पाचा वाद आता अधिकच चिघळला आहे. त्यातच, आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या प्रकल्पाला दणका दिला आहे.
 
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आधीच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने अदानी कंपनीला प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले असताना आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या प्रकल्पाला दणका दिला आहे. आवश्यक संमती आणि पर्यावरणीय मंजुरीशिवाय काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंडळाने उत्खनन आणि बांधकामाची कामे तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. मौजे सावरघर येथील गट क्रमांक 33 आणि 34 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीत आवश्यक परवानग्यांशिवाय उत्खनन आणि विकासकाम सुरू असल्याचे आढळून आले. त्यानंतर, सध्या सुरू असलेली तसेच प्रस्तावित उत्खनन आणि बांधकामाची कामे तात्काळ बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मंडळाची पूर्वपरवानगी मिळाल्याशिवाय कोणतेही काम पुन्हा सुरू करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

वन्यजीव रक्षकाची तक्रार, प्रकल्पाच्या अडचणीत वाढ

दरम्यान, या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे आधी राष्ट्रीय वन्यजीव मंडळ आणि आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशामुळे तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या अडचणीत भर पडली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Phoenix Mall Mumbai News: साताऱ्याचा मुलगा, नवी मुंबईची मुलगी, मराठी तरुण-तरुणीला कुर्ल्यात मारहाण, मुंबई पोलिसांनो, हुल्लडबाजांची मस्ती उतरवा!
साताऱ्याचा मुलगा, नवी मुंबईची मुलगी, मराठी तरुण-तरुणीला कुर्ल्यात मारहाण, मुंबई पोलिसांनो, हुल्लडबाजांची मस्ती उतरवा!
Shivendraraje Bhonsle: 'वरिष्ठांच्या सूचना देऊनही राष्ट्रवादी अन् सेनेने वेगळा निर्णय घेतला'; भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांची स्पष्टोक्ती; मंत्री जयकुमार गोरेंवरही अप्रत्यक्षपणे निशाणा
'वरिष्ठांच्या सूचना देऊनही राष्ट्रवादी अन् सेनेने वेगळा निर्णय घेतला'; शिवेंद्रराजे भोसले यांची स्पष्टोक्ती; मंत्री जयकुमार गोरेंवरही अप्रत्यक्षपणे निशाणा
Satara District bank Chairman Election 2026 Shambhuraj Desai: काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, सातारा जिल्हा बँकेत भाजपला झटका, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया
काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, सातारा जिल्हा बँकेत भाजपला झटका, शंभुराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Phoenix Mall Mumbai News: मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Sanjay Raut: डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sinhgad Education Society Case : सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
Embed widget