एक्स्प्लोर

Facts: वातावरणातील बदलाचा बिअरच्या चवीवरही परिणाम; आता नेमकी कशी लागते बिअरची चव? जाणून घ्या

Taste of Beer: आगामी काळात हवामान बदल ही सर्वात मोठी समस्या असणार आहे, यामुळे बिअरच्या चवीवरही परिणाम होऊ शकतो. याबाबतचं एक संशोधन समोर आलं आहे.

Taste of Beer: हवामान बदल (Climate Change) धोकादायक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. हवामान बदलाचा आरोग्यासह (Health) इतर गोष्टींवर, खाद्यपदार्थांवरही परिणाम होतो. बरेच जण हवामानात होणारे बदल नाकारत आहेत, पण हेच सत्य आहे.

तुम्ही बिअर (Beer) पित असो किंवा नसो,  तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हवामान बदलामुळे भविष्यात बिअरची चव देखील बदलणार आहे. अलीकडील संशोधनात असं आढळून आलं की, हवामानातील बदलामुळे बिअरवर परिणाम होईल, त्यामुळे ती अधिक महाग होईल आणि तिची चव बदलण्याची देखील शक्यता आहे.

या संशोधनातून झाला खुलासा

हवामानातील बदलामुळे बिअरच्या चवीवर कसा बरं परिणाम होतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पाणी आणि चहा नंतर बिअर हे तिसरं सर्वात लोकप्रिय पेय आहे. तर, जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या अल्कोहोलिक पेयाला त्याची विशिष्ट चव आणि वास हॉप्स नावाच्या फुलापासून मिळतो.पण भविष्यात या फुलांचं उत्पादन कमी होईल आणि त्यामुळे बिअरच्या गुणवत्तेवर देखील हवामान बदलाचा परिणाम होईल, असे द गार्डियनच्या अहवालात म्हटलं गेलं आहे.

भविष्यात बिअरची चव बदलणार

जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असं भाकीत केलं गेलं आहे की, जोपर्यंत शेतकरी उष्ण आणि कोरड्या हवामानाशी जुळवून घेत नाहीत, तोपर्यंत उत्पादन घटण्याची समस्या जाणवता राहील. युरोपच्या वाढत्या तापमानातील प्रदेशांमध्ये 2050 पर्यंत हॉपचं उत्पादन सुमारे 4 ते 18 टक्क्यांनी घसरेल. बिअरची चव बदलण्यास हॉप्समधील अल्फा ऍसिड कारणीभूत असल्याचाही अंदाज लावला गेला आहे. त्यामुळे भविष्यात सध्याच्या चवीच्या तुलनेत 20 ते 31 टक्क्यांनी बिअरची चव घसरेल.

अशा प्रकारेही दिसू शकतो परिणाम

"बिअर पिणार्‍यांना हवामानातील बदल, त्यामुळे बिअरच्या गुणवत्तेत झालेला बदल आणि किंमतीतील फरकाचा अंदाज नक्कीच लक्षात येईल, असं आमचा डेटा सूचित करतो," असं झेक अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या ग्लोबल चेंज रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ, अभ्यास सह-लेखक मिरोस्लाव त्रन्का म्हणतात. युरोपियन पबमध्ये तर, हवामान आणि राजकारणाव्यतिरिक्त बहुतेक वादविवाद हे बिअरवरुन होत असल्याचंही ते म्हणाले.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) नुसार, हवामान बदल जरी सर्वांसाठी हानीकारक असला तरी लोकांवर याचा विषम परिणाम होतो. अहवालात असं आढळून आलं आहे की, केवळ एक तृतीयांश राष्ट्रातील स्त्रिया आणि मुलींवर हवामान संकटाचा विषम परिणाम दिसून येतो. हवामानातील बदल आणि आरोग्याशी संबंधित गोष्टींवरही या संशोधनात अभ्यास केला गेला.

हेही वाचा:

Facts: कोण आहे जगातील सर्वात स्मार्ट सीईओ? जाणून घ्या कसं केलं जातं कॅल्क्युलेशन

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईलChhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget