Trending : तुम्ही चेन्नईचा chess-bridge पाहिला आहे का? पाहताच डोकं लागेल फिरायला! व्हिडीओ व्हायरल
Trending : हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचे डोके क्षणभर चक्रावून जाईल.
Trending : चेन्नईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचे डोके क्षणभर चक्रावून जाईल. बुद्धिबळ आहे की ब्रीज आहे, असा तुम्हाला प्रश्न पडेल. पण, जर तुम्हाला बुद्धिबळ खेळायला आवडत असेल तर तुम्हाला हा व्हिडीओ नक्कीच आवडेल.
IAS ने व्हिडिओ केला शेअर
आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हिडीओमध्ये असे दिसते की हे एक बुद्धिबळाचे मैदान आहे. हा व्हिडिओ चेन्नईमधील एका पुलाचा आहे.
Chennai the Chess Capital of India is all set to host the grand, Chess Olympiad 2022.The iconic Napier Bridge is decked up like a Chess Board.Check it out #ChessOlympiad2022 #ChessOlympiad #Chennai pic.twitter.com/wEsUfGHMlU
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) July 16, 2022
चेन्नईचा आयकॉनिक नेपियर ब्रिज
चेस ब्रिजचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चेन्नईला भारतातील बुद्धिबळाची राजधानी म्हटले जाते. व्हिडिओचे कॅप्शन असे आहे- 'भारताची बुद्धिबळ राजधानी चेन्नई भव्य बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 चे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. आयकॉनिक नेपियर ब्रिज चेस बोर्डाप्रमाणे सजवण्यात आला आहे.
व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडिओ आयएएस अधिकाऱ्याने ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. अवघ्या 21 सेकंदांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 16 जुलै रोजी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 8 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 17 हजारांहून अधिक ट्विटर युजर्सनीही व्हिडिओला लाईक केले आहे.
संबंधित इतर बातम्या
- Trending: ट्रॅफिकमध्ये विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना रिक्षावाल्यानं विचारला मजेशीर प्रश्न; तुम्हाला उत्तर माहितीये?
- Video Viral : हे फक्त मुंबईतच होऊ शकतं! लोकल ट्रेनमध्ये चक्क वाळत टाकले कपडे, Video होतोय व्हायरल
- Viral Video : समुद्र किनारी मस्ती करणं तरुणीच्या अंगलट, अचानक लाट आली अन्...; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा