(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trending: ट्रॅफिकमध्ये विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना रिक्षावाल्यानं विचारला मजेशीर प्रश्न; तुम्हाला उत्तर माहितीये?
विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना एका रिक्षा चालकानं (Auto Driver) एक मजेशीर प्रश्न विचारला आहे.
Autowala KBC Style Question : अनेक वेळा ट्रॅफिकमध्ये अडकलेले लोक विनाकारण हॉर्न (Horn) वाजवतात. काही लोक सिग्नल असल्यावर देखील हॉर्न वाजवतात. ट्रक, रिक्षावर विनाकारण 'हॉर्न वाजवू नका' असा संदेश लिहिलेला तुम्ही पाहिला असेल. पण तरी देखील लोक हॉर्न वाजवतात. आता विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना एका रिक्षा चालकानं (Auto Driver) एक मजेशीर प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न विचारताना त्यानं कौन बनेगा करोडपती या शो प्रमाणे लोकांना उत्तर देण्यासाठी चार पर्याय देखील दिले आहेत.
काय आहे प्रश्न?
रिक्षा चालकानं त्याच्या रिक्षावर या प्रश्नचे एक पोस्टर लावलेलं आहे. या पोस्टरवर 'हॉर्नमुळे त्रास होतो', असं लिहिलेलं दिसत आहे. त्याच्या खाली एक प्रश्न लिहिलेला दिसत आहे. 'ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवल्यानं काय होतं?' असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाला केबीसीप्रमाणे चार पर्याय देखील देण्यात आलेले आहेत. पाहा पर्याय:
A)लाइट लवकर ग्रीन होते.
B)रस्ता मोठा होतो.
C) गाडी उडायला लागते.
D) काहीच होत नाही
Tunku Varadarajan नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन या रिक्षाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या ट्वीटला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये ही दिल्लीमधील रिक्षा आहे, असं लिहिलेलं दिसत आहे. 12 जुलै रोजी हा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या ट्वीटला 24 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. चार हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हे ट्वीट रिट्वीट केलं तर अनेकांनी या फोटोला मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. या ट्वीटला तुषार मेहता यांनी कमेंट करत लिहिलं, 'मी अनेक वेळा सिग्नलवर हॉर्न वाजवणाऱ्यांना 'उपरसे ले जा' असा रिप्लाय दिला आहे'
Brilliant. On a three-wheeler in Delhi. pic.twitter.com/ikLsUqCst9
— Tunku Varadarajan (@tunkuv) July 11, 2022
काही लोक रस्त्यावर लोकांना त्रास देण्यासाठी हॉर्न वाजवतात. अशा लोकांना या रिक्षावाल्यानं हा प्रश्न विचारला आहे. आता या रिक्षावाल्याच्या प्रश्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
हेही वाचा: