Chandrayaan-3: चंद्रावर पाण्याची बाटली पाठवायला येईल 'एवढा' खर्च; संपूर्ण मालमत्ताही पडेल कमी
चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे, हे यान चंद्रावर पाठवण्यासाठी जवळपास 615 कोटींचा खर्च आला. जर एखादी पाण्याची बाटली चंद्रावर पाठवायची असल्यास किती खर्च येतो, माहीत आहे का?
Chandrayaan-3: चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगकडे केवळ भारतीयच नाही, तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या मोहिमेसाठी भारताने जवळपास 615 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर इतर देश अशा मोहिमांसाठी जास्त पैसा खर्च करतात. जर एखाद्या देशाला चंद्रावर एखादी व्यक्ती किंवा कोणतीही वस्तू पाठवायची असेल तर हा खर्च आणखी वाढतो. जर एखाद्या देशाला चंद्रावर (Moon) पाण्याची बाटली पाठवायची असेल तर त्यासाठी त्याला किती पैसे खर्च करावे लागतील, याबद्दल जाणून घेऊया.
चंद्रावर एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला पाठवण्याचा खर्च किती?
चंद्रावर एखाद्या व्यक्तीला पाठवण्याचं असेल तर त्याचा खर्च इतका जास्त आहे की 1972 नंतर आजपर्यंत चंद्रावर एखाद्या अंतराळवीराला पाठवण्याचा प्रयत्न कोणत्याही देशाने केलेला नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलेले शेवटचे अंतराळवीर हे यूजीन सर्नन (Astronaut Eugene Cernan) होते. आता एखाद्या व्यक्तीला चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, ते पाहूया.
जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे होते, तेव्हा अमेरिकेने पुन्हा एकदा चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची योजना आखली होती. यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज लावला गेला, तेव्हा तो 1.6 अब्ज डॉलर्स होता. भारतीय रुपयात बोलायचं झालं तर तो खर्च सुमारे 133 अब्ज रुपये इतका होता. एवढा खर्च पाहून अमेरिकेलाही घाम फुटला आणि त्यांनी हे अभियान तुर्तास थांबवलं.
हा झाला एखाद्या व्यक्तीला चंद्रावर पाठवण्याचा खर्च. आता चंद्रावर जर पाण्याची बाटली पाठवायची असेल तर किती खर्च येईल? वास्तविक असा प्रयोग आजवर झालेला नाही. पण सुरक्षितपणे पाणी पाठवण्यासाठी स्पेस क्राफ्टमध्ये ज्या प्रकारची सुरक्षा आणि तंत्रज्ञान वापरण्यात येईल ते चंद्रावर माणसाला पाठवण्यासारखंच असेल, त्यापेक्षा ते थोडं कमी असेल. एखाद्या व्यक्तीला चंद्रावर पाठवण्यासाठी जितका खर्च येतो त्यापेक्षा वस्तू पाठवण्याचा खर्च कमी येईल.
चंद्रावरील पावलांचे ठसे कधीच मिटत नाहीत का?
या प्रश्नावर शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, चंद्राची माती ही खडकांच्या छोट्या तुकड्यांपासून बनलेली आहे. म्हणूनच जेव्हा चंद्रावर गेलेल्या व्यक्तींच्या पावलांचे ठसे चंद्राच्या पृष्ठभागावर तसेच राहतात आणि ते लवकर मिटत नाहीत. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कधीकधी पावलांचे निशाण हजारो वर्षं असेच राहू शकतात. म्हणजेच आजपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणाऱ्या सर्व अंतराळवीरांची पाऊलं आजही चंद्रावर तशीच उपस्थित असतील.
हेही वाचा:
Chandrayaan-3 : ...तर चांद्रयान-3 चं लँडिंग पुढे ढकलणार, 23 ऑगस्ट नाही 'या' दिवशी होण्याची शक्यता