Biryani Samosa: कोक मॅगीनंतर चर्चेत आलाय 'बिर्याणी समोसा'; तुम्ही ट्राय करणार का?
Biryani Samosa Trending News: सोशल मीडियावर व्हायरल होतोय 'बिर्याणी समोसा'.
Biryani Samosa Trending News: रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. रमजानमध्ये रोजा पकडणारे आपला रोजा सोडताना मुख्यतः पारंपरिक व्यंजनांचा आधार घेतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान बिर्याणीला असतं. तसं पाहायला गेलं तर बिर्याणी म्हणजे, अनेकांचा विक पॉईंट. बिर्याणी नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. बिर्याणीचे विविध प्रकार आहे. व्हेज बिर्यानी, नॉन व्हेज बिर्यानी, दम बिर्यानी अन् इतरही अनेक. समोर ताटात बिर्यानी, एक पापड आणि त्यासोबत रायता असेल तर जेवणाची बात काही औरच... क्वचितच कोणी असेल जो बिर्याणीला नाही म्हणेल. पण आता ही बिर्याणी थोडीशी मॉडिफाय करुन तुम्हाला खायला दिली तर तुम्ही खाल का? मॉडिफाय म्हणजेच, आपण दररोज खाणाऱ्या आणि आतमध्ये बटाट्याचं सारण असणाऱ्या समोश्यात बिर्याणी भरुन तुम्हाला बिर्याणी समोसा खायला दिला तर खाल का?
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये बिर्याणी आणि समोशाचं फ्युजन करण्यात आलं आहे. सध्या कॅफे कल्चर किंवा स्ट्रीट फुडचं कल्चर वेगानं वाढतंय. त्यामुळे सहाजिकच स्पर्धाही वाढलीये. अशातच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपाय अन् अनेक फ्युजन फुड्सचा प्रयोग रेस्टॉरंट्सकडून सर्रास सुरू असतो. दोन वेगळ्या पदार्थांना मॉडिफाय करण्याच्या किंवा त्यांचं फ्युजन करण्याच्या नादात खरंच काही भन्नाट कॉम्बिनेशन्स चाखायला मिळतात. पण काही कॉम्बिनेशन्स खरंच तोंड वाकडं करण्यास भाग पाडतात. त्यापैकीच एक फ्युजन पदार्थ म्हणजे, 'बिर्याणी समोसा'.
presenting biryani samosa pic.twitter.com/i5wBCrNF7Y
— ghalib e wosta (@khansaamaa) March 26, 2023
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हा फोटो पाहुन नेटकऱ्यांनीही डोक्यावर हात मारला आहे. फोटोवर कमेंट्स करुन या फ्युजनवर नेटकरी चांगला संताप व्यक्त करत आहेत. यापूर्वीही अनेक फूड कॉम्बिनेशन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बिर्याणी समोसा खायला तुम्हाला आवडेल का?
ट्विटरवर @khansaamaa नावाच्या हँडलवरुन या बिर्याणी समोशाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये एका व्यक्तीच्या हातात समोसा आहे. या समोशाच्या आतमध्ये बिर्याणी स्टफ केली आहे. त्यानंतर दुसऱ्या एका फोटोमध्ये समोसा तळून झाला आहे. तर त्या व्यक्तीच्या हातात अर्धा तोडलेला समोसा असून त्यामध्ये बटाट्याच्या भाजीऐवजी बिर्याणी असल्याचं दिसतंय. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर वेगानं व्हायरल झाला. काही युजर्सना हे कॉम्बिनेशन खूपच आवडलं असून त्यांनी या पोस्टवर पॉझिटिव्ह रिप्लाय दिले आहेत. पण अनेक युजर्सनी मात्र या पोस्टवर कमेंट्स करुन हे भन्नाट कॉम्बिनेशन तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात बंडच पुकारला आहे.
नेटकरी संतापले
बिर्याणी समोश्याचा फोटो व्हायरल झाल्यापासून ट्विटरवर नेटकरी सतत या फ्युजनवर टीका करत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं आहे की, असा पदार्थ बनवणाऱ्या कूकला किचनमध्ये जाण्यास बंदी घातली पाहिजे. आणखी एका युजरनं कमेंट करून रेस्ट इन पीस समोसा आणि बिर्याणी असं लिहिलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :