जगातील सर्वात महागडा बोकड, किंमत ऐकून बसेल धक्का; 3BHK फ्लॅट पेक्षाही जास्त
Bakra Eid 2024 : अंगोरा प्रजातीचा बकरा जगात सर्वात महागड्या किमतीला विकला गेला होता. ही किंमत 1985 मध्ये देण्यात आली होती म्हणजे आजच्या घडीला ही किंमत खूप जास्त असेल.
मुंबई : बकरीदच्या (Bakrid 2024) दिवशी कुर्बानी देण्याची पद्धत आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, या वर्षी भारतात 17 जून रोजी बकरीद सण आहे. बकरीदच्या कुर्बानीसाठी असलेल्या बोकडांची किंमत गगनाला भिडलेली पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात तुम्हाला अशा अनेक बोकड सापडतील ज्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. पण आज तुम्ही जगातील सर्वात महागड्या बोकडाबद्दल जाणून घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बोकडाचं नाव त्याच्या महागड्या किंमतीमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे.
या बोकडाची किंमत किती?
ब्रॅड बोकड जगातील सर्वात महागड्या किंमतीला विकली गेली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, ब्रॅड नावाच्या या बोकडाची किंमत 82,600 अमेरिकन डॉलर आहे. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत अंदाजे 69 लाख रुपये आहे. अंगोरा जातीची ही बकरीची ब्रिटनमध्ये सर्वाधिक किंमतीला विकली गेली होती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही किंमत आजची नाही तर 1985 मध्ये दिली गेली होती. यावरूनच तुम्ही कल्पना करा, त्यावेळी या बोकडाची किंमत 1985 मध्ये सुमारे 70 लाख रुपये होती, तर या बोकडाची किंमत करोडोंमध्ये असेल.
अंगोरा बोकडाची वैशिष्ट्य काय?
पांढऱ्या केसांच्या अंगोरा शेळ्या ही जगातील सर्वोत्तम शेळ्यांची प्रजाती आहेत. या शेळ्या प्रामुख्याने लोकरीसाठी पाळल्या जातात. मात्र, बकरीदच्या वेळी अनेकजण त्यांचा बळीही देतात. त्यांच्यापासून निघणाऱ्या लोकरला मोहयर म्हणतात. हे लोकर अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे असते, यामुळेच या शेळ्यांची किंमत जास्त असते.
शेळी कशावरुन ठरते खास?
काही शेळ्या त्यांच्या प्रजातीमुळे तर काही त्यांच्या त्वचेवर लिहिलेल्या काही अक्षरांमुळे खास असतात. सन 2023 मध्ये अशाच एका शेळीची खूप चर्चा झाली होती, ज्याच्या मालकाने तिची किंमत 1 कोटी 12 लाख 786 रुपये ठेवली होती. शेरू असे या शेळीचे नाव होते. महाराष्ट्रात राहणाऱ्या या बकरीच्या मालकाने दावा केला की, या बकरीच्या शरीरावर अशा खुणा आहेत की, त्याकडे लक्षपूर्वक पाहिल्यास उर्दूमध्ये अल्लाह आणि मोहम्मद लिहिलेलं असल्याचं दिसून येतं. मात्र, ही शेळी विकण्याआधीच काही आजाराने मरण पावली.
इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम समाजात बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. ज्याला बकरी ईद म्हणतात. सौदी अरबमध्ये उंट आणि मेंढा यांची कुर्बानी देण्यात येते. विशेष म्हणजे यासाठी घेण्यात येणारा प्राणी कष्टाच्या पैशांनी घेण्यात यावा, म्हणजेच चुकीच्या पद्धतीने कमवलेल्या पैश्यातून घेतलेला नसावा. त्यानंतरच कुर्बानी मान्य होते. पण कुर्बानीचा देखील एक इतिहास आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :