(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : कात्री? छे! चक्क आगीचा वापर करून कापले केस, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल व्वा!
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यातील केस कापणारा व्यक्ती कात्रीऐवजी आगीने हेअरस्टाईल करताना दिसत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Viral Video : आपल्याकडे जुगाडू टॅलेंटची खरंच कमी नाही आणि सोशल मीडिया पाहिल्यावर याची वेळोवेळी प्रचिती येते. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ आणि फोटो व्हायरल (Viral Video) होत असतात. या सगळ्यात असेही काही व्हिडीओ असतात, जे नेटकऱ्यांना खूप आवडतात आणि त्यांच्या लक्षातही राहतात. असे व्हिडीओ इंटरनेटवर वाऱ्यासारखे पसरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओत एक माणूस चक्क आगीचा वापर करून हेअरस्टाईल करताना दिसत आहे.
सध्या तरुणाईमध्ये वेगवेगळ्या हेअरस्टाईल्सचा ट्रेंड आहे. हटके हेअरस्टाईल करून प्रत्येक जण चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो. विशेषत: मुले आपल्या हेअरस्टाईलबद्दल खूप जागरूक असतात. रोज नवनवीन हेअरस्टाईल करून आपण छान दिसावं, अस प्रत्येकालाच वाटतं. यासाठी काही तरुण तासन् तास सलूनमध्ये घालवतात. सध्या हेअरस्टाईलच नव्हे, तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीही प्रचंड चर्चेत आहेत. या दरम्यान असाच एक अनोखा हेअरस्टाईल आणि हेअरकटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेअरस्टाईलची हटके पद्धत
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सलूनमधील केस कापणार माणूस एका मुलाची हेअरस्टाईल करत आहे. बरं, तो यासाठी कैचीचा वापर करत नाहीये तर, चक्क आगीचा वापर करतोय. या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण या व्यक्तीची केस कापण्याची हटके पद्धत पाहू शकतो.
पाहा व्हिडीओ :
या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, सलूनमधील माणूस हातात लायटर घेऊन मशीन चालू करतो. या मशिनमधून आग सुरु होते आही हेअरकटची सुरुवात होते. यानंतर तो व्यक्ती तरुणाच्या केसांना पेटवू लागतो आणि दुसऱ्या हाताने कंगवा फिरवत त्या व्यक्तीचे केस विंचरू लागतो. या हटके पद्धतीने काही वेळातच खुर्चीवर बसलेल्या त्या व्यक्तीला नवीन हेअरस्टाईल मिळते. या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. जगभरातील लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सही मजेशीर कमेंट करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या