Independence Day 2023: भारतीय मुलगी जर्मनीच्या पाळणाघरात अडकली; पालकांची दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शनं
Germany: जर्मनीच्या फॉस्टर होममध्ये राहणाऱ्या अरिहा या भारतीय मुलीच्या आईने दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शनं केली आहेत. भारतीय समुदायासोबत मुलीला स्वातंत्र्यदिन साजरा करू द्या, अशी मागणी आईने केली आहे.
Indian Girl in Germany Foster Home: जर्मन फॉस्टर होममध्ये (पाळणाघरात) राहणाऱ्या अरिहा शाह या भारतीय मुलीची आई धारा शाह हिने शुक्रवारी (11 ऑगस्ट) दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शनं केली. जर्मन अधिकाऱ्यांनी अरिहाला जर्मनीमध्ये (Germany) राहणाऱ्या भारतीय (Indian) समुदायासोबत स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करण्याची परवानगी द्यावी, अशी आई धारा शाहची मागणी आहे.
भारताचा स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे आणि त्यामुळे अरिहाला तिच्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती जर्मन दूतावासात जाऊन जर्मन राजदूतालाही करणार असल्याचं अरिहाच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. हा दिवस साजरा करणं हा सांस्कृतिक अधिकार आहे आणि तो जपायला हवा, असंही त्यांचं म्हणणं आहे.
मुलीला भेटूही शकत नाही पालक
अरिहाची आई धारा शाह हिने सांगितलं की, या वर्षी जूनमध्ये न्यायालयाने अरिहाला जर्मन चाइल्ड सर्व्हिस दिली होती. अरिहाला तिथून आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी त्यांच्याकडे कोणी नसल्यामुळे त्यांच्या बाळाला त्यांना भेटताही येत नाही. मागच्या भेटीत अरिहाला देण्यासाठी काही भेटवस्तूही पालकांनी जर्मन अधिकाऱ्यांकडे दिल्या होत्या, परंतु त्या देखील त्यांनी परत केल्या. अरिहा नेमकी कुठे आहे आणि कोणत्या स्थितीत आहे, हेही माहीत नसल्याचं तिच्या पालकांनी म्हटलं, तर तिच्या सुरक्षेची चिंता लागून राहिल्याचंही ते म्हणाले.
अरिहा वयाच्या 7 महिन्यांपासून पाळणाघरात
अरिहा शाहचा जन्म 2021 मध्ये जर्मनीची राजधानी बर्लिन येथे झाला. अरिहाचे वडील भावेश शाह हे गुजरातचे एक इंजीनिअर आहेत, 2018 मध्ये ते पत्नी धारासोबत बर्लिनला गेले. 23 सप्टेंबर 2021 रोजी अरिहा सात महिन्यांची असताना तिला तिला जर्मन अधिकार्यांनी फॉस्टर होममध्ये नेलं आणि तिचं अधिकृत पालकत्व स्वीकारलं. अरिहाचे आई-वडील धारा आणि भावेश यांनी अरिहासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप जर्मन अधिकाऱ्यांनी केला होता.
जरी जर्मन अधिकाऱ्यांनी अत्याचाराचे आरोप मागे घेतले असले तरी त्यांनी तिच्या पालकांना निष्काळजीपणासाठी जबाबदार धरलं आहे.
भारत करत आहे मुलगी परत करण्याची मागणी
मुलीला लवकरात लवकर परत देण्यासाठी भारताने जर्मनीवर दबाव आणला आहे आणि मुलीला तिच्या भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात राहणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. त्यावर, भारतीय पालकांनी त्यांच्या मुलीला त्रास दिल्यानंतरच तिला फॉस्टर होममध्ये (पालनपोषण गृहात) ठेवण्यात आल्याचं सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Japan Earthquake : जपानमध्ये 6.0 रिश्टर स्केलचा जोरदार भूकंप; तुर्कीमध्येही भूकंपामुळे अनेक जण जखमी