Anand Mahindra Tweet: स्टूलचा नाविण्यपूर्ण वापर करत गुडघाभर पाण्यातून वाट; आनंद महिंद्रांनी केलं जुगाडू युवकाचं कौतुक, म्हणाले...
Viral Video : एक युवक स्टूलच्या मदतीने पाण्यातून मार्ग काढतानाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.
मुंबई: आनंद महिंद्रा हे आपल्या ट्वीटमुळे कायम चर्चेत असतात. भारतात कुठे काय झालं, काहीतरी नाविण्यपूर्ण प्रयोग करण्यात आले किंवा इतर काही दखल घेण्यासारखं घडलं तर आनंद महिंद्रा हे त्याचं कौतुक करतात. आताही अशाच एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत त्यांनी कौतुक केलं आहे. एक तरुण स्टूलचा वापर करुन पाण्यातून वाट काढत जातो, हा व्हिडीओ शेअर करत गरज ही शोधाची जननी असल्याची कमेंट आनंद महिंद्रा यांनी केली आहे.
काय आहे व्हिडीओत?
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये दिसतंय की, एक तरूण पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातून दोन स्टुलांचा वापर करत मार्ग काढत एका दुकानापर्यंत पोहोचतो. एक स्टूलवर उभा राहून तो युवक दुसरा स्टूल पूढे ठेवतो आणि मग त्यावर उभा राहून पुढे जातो. महत्त्वाचं म्हणजे तो जराही भिजत नाही. या तरुणाचा हाच जुगाड आनंद महिंद्रा यांना आवडला आणि त्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. गरज ही शोधाची जननी असल्याचं आनंद महिंद्रा यांनी त्याला कॅप्शन दिलं आहे.
👍🏽 As the saying goes: Necessity is the mother of invention… pic.twitter.com/VjyD2LzgAR
— anand mahindra (@anandmahindra) July 8, 2022
आनंद महिंद्रा यांनी या जुगाडू युवकाचं चांगलंच कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि हा युवक कोण आहे हे मात्र समजलं नाही. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केल्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
महत्त्वाच्या बातम्या:
- Trending Anand Mahindra : तुम्ही NRI आहात का? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देत आनंद महिंद्रांनी जिंकली मने, म्हणाले...
- Anand Mahindra : अग्निपथविरोधात हिंसक आंदोलन, उद्योजक आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा
- RBI Board : RBI बोर्डात आनंद महिंद्रा, पंकज पटेल आणि आणखी दोन उद्योगपतींचा समावेश; जाणून घ्या