Anand Mahindra Tweet : आज टायटॅनिक बुडाली असती तर चित्र कसं असतं? आनंद महिंद्रांचे ट्वीट चर्चेत
Anand Mahindra Tweet : आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्वीटमध्ये टायटॅनिकचा एक फोटो शेअर केला आहे. पण या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे.
मुंबई : आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे त्यांच्या विविध उपक्रमांमुळे सदैव चर्चेत असतात. असंच आनंद महिंद्रा यांचं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि बरेचदा मनोरंजक आणि मजेदार व्हिडिओ आणि कथा त्याच्या चाहत्यांसह शेअर करतात. त्यांच्या अशाच एका ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. काही दशकांपूर्वी बुडालेलं जहाज टायटॅनिक (Titanic) हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्याचसंदर्भातलं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलंय. आताच्या स्थितीला टायटॅनिक बुडाली असती तर काय झालं असतं, या संदर्भातले ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलंय.
आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत टायटॅनिक जहाज बुडताना दाखवले आहे. पण, यात खास गोष्ट म्हणजे पाण्यात उपस्थित असलेले लोक, जे टायटॅनिक बुडत असताना कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवत आहेत.काळाच्या ओघात आपण मोबाईलचे गुलाम कसे बनत चाललो आहोत हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रावरुन केला गेलाय. आश्चर्याची बाब म्हणजे हे चित्र आजचे नाही तर ते 2015 सालचे आहे. यामध्ये आनंद महिंद्रा यांनी म्हटलं की, जर आज टायटॅनिक बुडले असते... हा मीम पहिल्यांदा 2015 मध्ये दिसला होता. परंतु प्रत्येक सरत्या दिवसाबरोबर त्याची जाणीव होतेय.
“If the Titanic sank today..”
— anand mahindra (@anandmahindra) January 12, 2024
This meme first came out back in 2015. But it feels more and more relevant with every passing day… pic.twitter.com/LSKizjco3q
सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत
या पोस्टला आतापर्यंत सोशल मीडियावर 3 लाख लोकांनी पाहिलं आहे आणि 9 हजारांपेक्षा अधिक लाइक्स देखील मिळालेत. हा फोटो एका व्यंगचित्रकाराने बनवला आहे. फोटोमध्ये टायटॅनिक बुडताना दिसत असून पाण्यात उपस्थित लोकांचा जमाव मोबाईल फोनवरून त्याचा व्हिडिओ बनवत आहे. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन हे ट्वीट केलं आहे.
या फोटोवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी म्हटलं की, लोक त्यांच्या फोनमुळे स्वत:बुडत आहेत. एकाने लिहिले, खरच आपण काळासोबत मोबाईलचे गुलाम होत चाललो आहोत. आपण विचार करणे आणि समजून घेणे बंद केले आहे. दुसर्याने लिहिले, आमच्या आजच्या पिढीचे दुःखद सत्य!
हेही वाचा :
Self Confidence : स्वत:ला कधीही समजू नका कमी; 'या' 5 टिप्स वाढवतील तुमचा आत्मविश्वास