Nagpur Roads : कोतवाली चौक ते गंगाबाई घाट रोडपर्यंत वाहतूक प्रतिबंधित
रस्त्यावरील वाहतूक झेंडा चौक ते सक्करदरा मार्गाने दुतर्फा जाईल तसेच इतर वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून वळविण्याचे मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

नागपूर : सीमेंट रोड बांधकामाकरिता कोतवाली चौक ते गंगाबाई घाट सी.सी. रोडपर्यंतची वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा दोन, पॅकेज 15 अंतर्गत कोतवाली चौक ते झेंडा चौक व माणिपूरा चौक ते गंगाबाई घाट सी. सी. रोड सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2022 पर्यंत उपरोक्त मार्गावरून कोणत्याही वाहतुकीस दोन्ही बाजुकडील मार्ग बंद करण्यात येणार आहे. नमूद रस्त्यावरील वाहतूक झेंडा चौक ते सक्करदरा मार्गाने दुतर्फा जाईल तसेच इतर वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून वळविण्याचे मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.
Nagpur : नागपुरात ड्रग्स विरोधात लढणार 'पोलीस काका'; तरुणाईमध्ये अमली पदार्थाचा वापर रोखण्याकरता पोलिसांचा अभिनव उपक्रम
सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा
काम सुरू असलेल्या ठिकाणी मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात सदर आलेले आदेश या रस्त्यादरम्यान दोन्ही बाजूस ठळक अशा ठिकाणी नागरिकांच्या सुचनेकरिता लावणे, सदर रस्ता वाहतूक बंद करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी कांबी किंवा खांब व इतर संपर्क साधने वापरून रस्त्यावरील वाहतूक बंद करणे, आवश्यक वळण मार्ग दर्शविणारे फलक योग्य त्या ठिकाणी उभारणे, या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता अशी व्यवहार्य सुविधा उपलब्ध करणे तसेच विहित कालमर्यादेत काम पूर्ण करून रस्ता वाहतूकीस खुला होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
NMC elections 2022 : भाजप करणार 'सर्व्हे', कॉग्रेसला हवे 'नाव', छोटया पक्षाचे 'वेट अँड वॉच'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
