Health Tips : 'या' कारणामुळे उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा अधिक होते; कारण आणि प्रतिबंध उपाय जाणून घ्या
Health Tips : जेव्हा आपण बॅक्टेरिया, विषाणू, परजीवी, विषारी पदार्थ असलेले अन्न खातो तेव्हा कोणत्याही व्यक्तीला अन्न विषबाधा होते.
Health Tips : कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. या उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होणं ही सामान्य बाब आहे. अन्नातून विषबाधा कोणालाही होऊ शकते. पण अनेकदा आपल्याला अन्नातून विषबाधा झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं? असा प्रश्न पडतो. अशा वर सोपा उपाय म्हणजे जर तुम्हाला पोटदुखी, जळजळ, उलट्या, डोकेदुखी या सर्वांचा एकत्रित त्रास होत असेल तर ही अन्न विषबाधाची काही चिन्हं आहेत. जर हा त्रास तुम्हाला बऱ्याच काळापासून होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर नसेल तर काही घरगुती उपायांनीही तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.
अन्न विषबाधा होण्याचे कारण
जेव्हा आपण बॅक्टेरिया, विषाणू, परजीवी, विषारी पदार्थ असलेले अन्न खातो तेव्हा कोणत्याही व्यक्तीला अन्न विषबाधा होते. सोप्या भाषेत बोलायचे तर खराब अन्न खाल्ल्याने विषबाधा (Food Poisoning) होते. अन्न कसे खराब होते ते कसे शिजवले जाते आणि त्यात कोणते पदार्थ टाकले गेले यावर अन्नाची विषबाधा अवलंबून असते. ते स्वयंपाक करताना देखील खराब होऊ शकते. एवढेच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसात खाद्यपदार्थ लगेच खराब होतात.
'या' निष्काळजीपणामुळे अन्नही खराब होते
- अन्न योग्य प्रकारे शिजवलेले नाही.
- फ्रिजमध्ये बराच काळ अन्न साठवले आहे.
- आधीच आजारी असलेल्या व्यक्तीने अन्नाला स्पर्श केला आहे.
- कटिंग बोर्ड किंवा चाकू नीट साफ केला नाही.
- स्वच्छ स्वयंपाक केला नाही.
- स्वयंपाकात तेलाचा वारंवार वापर केला.
अन्न विषबाधा टाळण्यासाठी उपाय काय?
स्वयंपाक करताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. सर्वात आधी, जंक आणि प्रोसेस्ड फूडपासून दूर राहा. कारण त्यात घातक रसायने आणि विषारी पदार्थांचे प्रमाण
खूप जास्त आहे. त्यामुळे नंतर अन्नातून विषबाधा होऊ शकते. जर तुम्ही पोटाशी संबंधित कोणत्याही दिर्घकालीन आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही फक्त झटपट शिजवलेले अन्नच खावे. अन्न विषबाधाचे लक्षण देखील परिस्थिती अधिक वाईट करू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : 8 तास झोप घेऊनही दिवसभरात झोप येते? असू शकतात हायपरसोमनियाची लक्षणं; वेळीच सावध व्हा