Nagpur : संशय आला अन् तिने पतीला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले
लॉजमध्ये तिने पती आणि त्याच्या प्रेयसीला जाताना बघितले. लॉजमध्ये जाण्याची हिंमत नसल्याने तिने टोल फ्री क्रमांकावर मदत मागितली. पोलिसांनीही प्रतिसाद देत गाठून पती व त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले.
नागपूरः गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील लॉज विविध कारणांमुळे चर्चेत आहे. त्यात पुन्हा सावनेर शहरातील लॉजवरील घटनेची भर पडली आहे. या लॉजवर पत्नीने आपल्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहात पकडले. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले मात्र आपसी समझौता झाल्याने प्रकरणाची नोंद झाली नाही.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील एका लॉजवर संबंध बनविण्यापूर्वी तरुणाने गोळ्यांचे सेवन केले होते. संबंध बनवताना मुलाचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील बहुतांश लॉज हे प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान बनले आहे. लॉजवर एकाने आत्महत्याही केली होती. तर एका प्रकरणात प्रेयसीसमोर तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पुन्हा लॉजचे किस्से चर्चेचा विषय बनले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवी येथील विवाहीत व्यक्तीचे खापरखेडा येथील एका विवाहीतेशी सुत जुळले. त्याला दोन मुली असून तिला मुलगा व मुलगी आहे. अनेक वर्षांपासून हे प्रेम फुलत होते. दोघांच्या भेटीगाठीही व्हायच्या. फोनवर बोलत असताना त्यांची रविवारची भेट ठरली. मात्र फोनवरील गोष्टींकडे पत्नीचे लक्ष असल्याचे त्याला लक्षातच आले नाही. रविवारी सकाळी तयारी करुन तो घरातून निघाला. पत्नीनेही त्याचा पाठलाग केला. पाठलाग करत ती सावनेर शहरातील एका लॉजच्या बाहेर पोहोचली.
लॉजमध्ये तिने पती आणि त्याच्या प्रेयसीला जाताना बघितले. लॉजमध्ये जाण्याची हिंमत नसल्याने तिने महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला व मदत माहितली. पोलिसांनी लगेच प्रतिसाद देत लॉज गाठून पती व त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले. पत्नीने ही हकीकत तिच्या आई-वडिलांसह नातेवाइकांना सांगितली. त्यानंतर पोलिस ठाण्यात आपसी समझोता करण्यात आला. मात्र शहरात दिवसभर या किस्स्याची चर्चा सुरु होती.
अॅपबेस रुम बुकिंगही जोरात
विविध मोबाइल अॅप्लिकेशनवर आधारीत हॉटेल बुकिंगची ही तरुणामध्ये चांगलीच वाढली असून महाविद्यालयाशेजारी असलेल्या हॉटेलची तर आठवडा भर बुकिंग हाऊसफुल्ल असते. शहरातील अनेक लॉज चालक तर काही अतिरिक्त पैसे घेऊन कुठलेही ओळखपत्र न घेता थेट रुमची चाबी तरुणांना देतात. यात अनेकवेळा अल्पवयीनांना देखील बुकिंग देण्यात येत असल्याची माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या