एक्स्प्लोर

Thane Crime : ठाणे पूर्वमध्ये कोपरीतील तरुणाची हत्या; धारदार शस्त्रांनी हत्या करून तरुण अन् तरुणी पोलिसांना शरण

धारदार शस्त्रांनी हत्या करून तरुण आणि तरुणी पोलिसांना शरण आले आहेत. सोहम परांजपे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मैत्रीणीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ठाणे : ठाणे पूर्वमध्ये (Thane Crime) तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्रांनी हत्या करून तरुण आणि तरुणी पोलिसांना शरण आले आहेत. सोहम परांजपे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मैत्रीणीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोहम परांजपेची राहत्या घरी हत्या करण्यात आली. अष्टविनायक चौकातील संचार सोसायटीमध्ये सोहम राहत होता. आज सायंकाळी साडे नऊ वाजता सोहमचा मृतदेह आढळून आला. मैत्रीणीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

प्रेमसंबंधातून तरुणाने संपवले जीवन

दरम्यान, बीड (Beed) जिल्ह्यातील नेकनूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या आई-वडिलांकडून लग्नास नकार मिळाल्याने बीडच्या नेकनूर येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिकेत थोरात असं या तरुणाचं नाव असून त्याचा मृतदेह एका मंगल कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनं नेकनूर शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, पोलिस (Police) अधिक तपास करत आहेत.

अनिकेतचे मागील चार वर्षांपासून एका मुलीबरोबर प्रेम संबंध होते, या दोघांचे लग्न करायचे देखील ठरले होते. यादरम्यान मुलीचे आई-वडील अनिकेतच्या घरी गेले असता मुलगी द्यायची की नाही यावरून वाद झाला. याच वादातून अनिकेत घरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर, कुटुंबीयांनी व मित्रपरिवाराने परिसरात शोधाशोध केली असता एका मंगल कार्यालयात अनिकेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, अनिकेतच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून त्यात पाच नावे आहेत. आता, या प्रकरणात नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
Rahul Gandhi In Kolhapur : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBopdev Ghat Crime:  बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणाती संशयित आरोपींचं स्केच पूर्णRahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावरAhmednagar name Change : नगरचं नाव अहिल्यानगर करण्याला केंद्र सरकारची मंजूरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
Rahul Gandhi In Kolhapur : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
Maharashta Vidhan Sabha Election : सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
Harshvardhan Patil: शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
Rahul Gandhi In Kolhapur : कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
Embed widget