एक्स्प्लोर

Bhiwandi Crime : रुबाबात राहणं आणि कॉलगर्लचा नाद जीवावर बेतला; 42 वर्षीय व्यक्तीची हत्या, दोन कॉलगर्ल्ससह एक साथीदार अटकेत, दुसरा फरार

त्नीपासून विभक्त राहणाऱ्या भिवंडीतील 42 वर्षीय व्यक्तीला कॉलगर्लचा नाद जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन कॉलगर्ल्सनी त्यांच्या बॉयफ्रेण्डशी संगणमत करुन घरातील रोकड चोरल्याच्या उद्देशाने त्याची केली.

Bhiwandi Crime : पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या भिवंडीतील 42 वर्षीय व्यक्तीला कॉलगर्लचा (Call Girl) नाद जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलगर्लवर पैशांची उधळपट्टी पाहून दोन कॉलगर्ल्सनी त्यांच्या बॉयफ्रेण्डशी संगणमत करुन या व्यक्तीच्या घरातील रोकड चोरण्याच्या उद्देशाने त्याची धारदार चाकूने गळा चिरुन निर्घृण हत्या (Murder) केली. ही घटना कल्याण-पडघा मार्गावरील बापगांव गावातील मल्हारनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी दोन कॉलगर्ल्ससह एक साथीदाराला अटक केली आहे. मात्र गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

शिवाणी धर्मा जगताप (वय 24 वर्षे), भारती गोविद कोमरे (वय 30 वर्षे) अशी अटक केलेल्या कॉलगर्ल्सची नावे असून संदीप माणिक पाटील असे अटक केलेल्या कॉलगर्लच्या बॉयफ्रेण्डचे नाव आहे. हे तिघेही उल्हासनगरमधील माणेरे गावात राहणारे आहेत. देवा रॉय (रा.गायकवाड पाडा अंबरनाथ) असे फरार आरोपीचे नाव आहे. तर दीपक सीताराम कुऱ्हाडे (वय 42, रा. बापगांव) असे निर्घृण हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेवून चोरीचा कट रचला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दीपक हा गेल्या चार वर्षापासून बापगावमधील मल्हार नगरमधील परिसरात पत्नीपासून विभक्त राहत होता. तो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी असून इंटीरियरचे कामे घेण्याचा ठेकेदार असून मोठ्या रुबाबात राहत होता. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून त्याची ओळख आरोपी कॉलगर्ल शिवानीसोबत झाली होती. स्वतःची  शारीरिक भूक भागवण्यासाठी तो तिला कॉल करुन घरी बोलवत होता. त्यावेळी तो तिच्यावर पैशांची उधळपट्टी करुन मद्यधुंद अवस्थेत शारीरिक भूक भागवत होता. तर कधी कधी दोन कॉलगर्ल्सना घरी बोलावून दोघींशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्यातच मध्यतंरी आरोपी शिवानीने दीपकच्या घरी येणे बंद केलं होत.29 जून 2023 रोजी दीपकने कॉलगर्ल शिवानीला कॉल करुन शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरुन तिने बॉयफ्रेण्ड संदीप, तिची मैत्रीण कॉलगर्ल भारती आणि तिचा बॉयफ्रेड देवा यांच्याशी संगनमत मृताच्या घरातील ऐवज आणि रोकड लुटण्याचा कट रचला होता.

चाकूने गळा कापला

त्यानंतर मृत दीपकने आरोपी शिवानीला कॉल केला. तेव्हा 30 जून 2023 रोजी दोघी आरोपी कॉलगर्ल रात्रीच्या सुमारास दीपकच्या घरी रिक्षाने आल्या होत्या. त्या रात्री दोघींनीही दीपकसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत त्याला भरपूर दारु पाजली. त्यानंतर दोन्ही बॉयफ्रेण्ड हे अॅक्टिव्हा दुचाकीवरून दीपकच्या घरी पोहोचले असता, या चौघांनी मिळून दीपकच्या डोक्यात दारुची बाटली फोडून त्याचा धारदार चाकूने गळा चिरला. जाताना दीपकच्या घराच्या दाराला बाहेरुन कडी लावून एकाच अॅक्टिव्हावरुन चौघे फरार झाले होते.

16 मुलीला वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले

दरम्यान दीपकच्या आईने त्याच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आईने कल्याणमध्ये राहणाऱ्या त्याच्या घटस्फोटित पत्नीला कॉल करुन दीपकच्या घरी काही तरी घडले असून बघून ये असे सांगितले. त्यानंतर दीपकची 16 वर्षीय मुलगी बापगावला आली. वडील राहत असलेल्या घराला बाहेरुन कडी लावलेली तिला दिसली. तिने कडी उघडल्यावर घरात वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पडघा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना करुन अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साबळे, सपोनि नितीन मुद्गुल  आणि ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस सुरेश मनोरे यांच्या पथकाने सुरु केला. यावेळी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि मृताच्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक तपास करुन मोबाईल लोकेशनवरुन आरोपी शिवानीला  उल्हासनगरमधील माणेरे गावातून ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, तिने आरोपी संदीप, देवा  आणि भारती असे चौघांनी मिळून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.

तीन आरोपींना अटक, एक जण फरार

दीपक कुऱ्हाडे हा ठेकेदार असून परिसरात अतिशय रुबाबात राहायचा. भावाने सांगितल्याप्रमाणे दीपक अंगावर सोन्याचे दागिने घालत होता आणि अतिशय थाटामाटात तसंच श्रीमंतासारखा आयुष्य जगत होता. तर दुसरीकडे दीपक कुऱ्हाडेला कॉलगर्लचा नाद होता आणि तोच त्याच्या जीवावर बेतला. कॉलगर्लने दिलेल्या कबुलीनुसार मयत हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसे उडवत होता. गळ्यामध्ये सोन्याची चैन, हातात सोन्याची अंगठी असं श्रीमंतांसारखे जीवन जगत होता. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असतील या हेतूने या कॉलगर्लने दीपकचा काटा काढून त्याच्या घरात असलेली संपत्ती लुटायचा प्लॅन आखला. मैत्रीण आणि बॉयफ्रेण्डसोबत मिळून कॉलगर्लने दीपकची गळा चिरुन हत्या केली आणि तिथून पसार झाले. पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून आरोपी शिवानी धर्मा जगताप (वय 24 वर्षे) भारती गोविद कोमरे (वय 30 वर्षे) बॉयफ्रेण्ड संदीप यांना अटक केली. तर आरोपी देवा अद्यापही फरार आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 30 हजार रुपये रोख, चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे. 

दुसरीकडे  मृताच्या भावाने सांगितलं की, माझा भाऊ दीपक हा अंगावर खूप दागिने घालून रुबाबात राहत होता. मात्र त्याची हत्या करणाऱ्या आरोपीना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. पोलिसांना आरोपींकडून दागिने सापडले नाहीत, त्यामुळे मृतक दीपकच्या अंगावरील दागिने कुठे गेले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा

Bhiwandi Crime : भिवंडीत सात अट्टल गुहेगारांकडून 23 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget