Dombivli : अडीच वर्षाची मुलगी खाडीत बुडाली, वाचवण्यासाठी पाण्यात गेलेले वडीलही बुडाले; डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Dombivli : डोंबिवलीच्या खाडीमध्ये एक अडीच वर्षाची मुलगी आणि तिचे वडील बुडाले असून फायर ब्रिगेडच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे.
ठाणे: डोंबिवलीतील राजूनगर खाडीत (Dombivli Bay) एक अडीच वर्षाची चिमुकली आणि तिचे वडील बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी फायर ब्रिगेड यांनी शोध मोहिम सुरू केली आहे. फायर ब्रिगेडचे कर्मचारी या दोघांचाही शोध घेत आहेत.
डोबिवली पश्चिमेतील राजूनगर परिसरात खाडी किनारी एक इसम तिच्या अडीच वर्षाच्या मुलीसोबत आले होते. ती मुलगी खेळत होती. खेळत असताना ती खाडी किनारी गेली. अचानक ती पाण्यात पडली. त्यावेळी मुलगी बुडत असल्याचं दिसताच तिचे वडीलही तिला वाचवण्यासाठी गेले, त्यांनी पाण्यात उडी घेतली.
चांद शेख नावाचा तरुण या दोघांना वाचवण्यासाठी धावला, मात्र दोघेही बुडाले होते. काही अंतरावर चांद शेख यांनी त्या आजोबाचा हात पाहिला. मात्र तो त्यांना वाचवू शकला नाही. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास म्हात्रे घटनास्थळी पोहचली. त्यांनी याची माहिती विष्णूनगर पोलिसांना दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे त्यांच्या पोलीस पथकासोबत खाडी किनारी पोहचले. फायर ब्रिगेडचे पथकही दाखल झाले आहेत. शोध मोहिम सुरू झाली आहे. हो दोघे कोण होते आणि ते कुठून आले याचा तपास पोलीस करत आहेत. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काकांच्या अस्थी विसर्जनासाठी गेले अन् काळाने घात केला
एका महिन्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली. वर्धा नदीत बुडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतकांमध्ये चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि भाजप नेते गोविंदा पोडे यांचा समावेश आहे. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथे ही दुर्दैवी घटना घडली. घरातील व्यक्तीच्या अस्थी विसर्जनासाठी गेल्यानंतर या तिघांचा बुडून मृत्यू झाला.
गोविंदा पोडे हे त्यांच्या काकांच्या अस्थी विसर्जनासाठी गावाजवळ असलेल्या वर्धा-इरई नदीच्या संगमावर गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयदेखील होते. यावेळी अस्थी विसर्जनासाठी नदीत उतरलेला त्यांचा मुलगा चेतन पोडे आणि भाचा गणेश उपरे पाण्यात बुडू लागल्याने गोविंदा पोडे यांनी नदीत उडी घेतली. मात्र दुर्दैवाने नदीत बुडून तिघांचाही मृत्यू झाला. एकाच कंटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.
ही बातमी वाचा: