एक्स्प्लोर

Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारी ठाण्यातील काही भागात दुपारी 12 ते रात्री 12 पाणीपुरवठा राहणार बंद

ठाण्यात शुक्रवारी दुपारी 12 ते रात्री 12 या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन  विभागातील नागरिकांना केले आहे

Thane Water Cut : ठाण्यच्या पाणीपुरवठ्याबाबत (Thane Water Cut Nws) मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यात शुक्रवारी  (1 डिसेंबर) पाणीपुरवठा विषयक दुरुस्ती कामामुळे ठाण्यातील काही  विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.  ठाण्यात (Thane News)  काटई नाका येथे एमआयडीसीच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या भागात होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी दुपारी 12 ते रात्री 12 या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन  विभागातील नागरिकांना केले आहे. 

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) शुक्रवारी काटई नाका येथे जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या कामामुळे ठाणे महपालिका क्षेत्रात शुक्रवारी दुपारी 12 ते रात्री 12 या कालावधीत एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तातडीचे काम हाती घेतल्यामुळे शुक्रवारी 12  तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

ठाण्यातील 'या' भागात राहणार पाणी बंद (Thane Water Cut)

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा, वागळे इस्टेट येथील रुपादेवी पाडा, किसननगर, नेहरूनगर आणि घोडबंदर येथील कोलशेत भागात एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा केला जातो. काटई नाका येथे एमआयडीसीच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या भागात होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी दुपारी 12 ते रात्री 12 या कालावधीत बंद राहणार आहे. तसेच दुरूस्तीनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. 

पाणी जपून वापरण्याचं आवाहन

ठाणे महानगरपालिकेने बाधित भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे आणि शटडाऊन दरम्यान महामंडळाला सहकार्य करावे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे.  पाणी कपातीच्या कालावधीत ठाणेकर नागरिकांची गैरसोय होणार आहे. पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

हे ही वाचा :

Thane Crime : इन्स्टाग्रामवर रील स्टार, प्रत्यक्षात बनावट नोटांचा डीलर? पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघड 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
×
Embed widget