मुख्यपृष्ठबातम्याठाणेThane Vidhan Sabha Election 2024: ठाण्यात एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंची मनसे महागात पडणार?; नागरिकांची बेधडक उत्तरं, पाहा VIDEO
Thane Vidhan Sabha Election 2024: ठाण्यात एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंची मनसे महागात पडणार?; नागरिकांची बेधडक उत्तरं, पाहा VIDEO
Thane Vidhan Sabha Election 2024: विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर एबीपी माझाने ठाण्यातील जनतेचा कौल घेतला.
By : अक्षय भाटकर, एबीपी माझा | Edited By: मुकेश चव्हाण | Updated at : 21 Nov 2024 03:17 PM (IST)
Thane Vidhan Sabha 2024
Source : ABP
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Thane Vidhan Sabha ठाणे: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 65 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीसमोर या निवडणुकीत सत्ता राखण्याचे आव्हान असून सत्ताधाऱ्यांना महाविकास आघाडीने कडवी टक्कर दिली. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान वाढले आहे. वाढलेले मतदान कोणाला सत्तेवर बसविणार, याचा उलगडा शनिवारी 23 नोव्हेंबरला होणार आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 56.05 टक्के मतदान झालं.
विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर एबीपी माझाने ठाण्यातील जनतेचा कौल घेतला. यावेळी ठाणे विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. ठाणे मतदारसंघात मनसेकडून अविनाश जाधव, भाजपकडून विद्यामान आमदार संजय केळकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणात होते. या ठाणे मतदारसंघात अनेकांनी अविनाश जाधव यंदा बाजी मारतील अशी उत्तर दिली. तर पुन्हा संजय केळकर विजयी होतील, असा अंदाज देखील ठाणेकरांनी व्यक्त केला. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. आता याच बालेकिल्ल्यात आणि ठाणे मतदारसंघात मनसेचे अविनाश जाधव निवडून आल्यास एकनाथ शिंदेंना मनसे महागात पडेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जातेय. तर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात विद्यामान मुख्यमंत्री पुन्हा जिंकून येतील, असा विश्वास ठाणेकरांनी व्यक्त केला आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघात देखील चुरशीची लढत होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मुंब्रा-कळवा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नजीब मुल्ला यांच्यात लढत होणार आहे. तर ओवळा माजिवडा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून नरेश मनेरा यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या मतदारसंघात नागरिकांनी पुन्हा महायुतीचा उमेदवार जिंकून येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर काही लोकांनी महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल असं मत व्यक्त केलं आहे.
ठाणे जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?
मुंब्रा-कळवा - 52.01 टक्के ठाणे - 59.01 टक्के कोपरी पाचपाखाडी - 59.85 टक्के ओवळा माजिवडा - 52.25 टक्के
Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरं, Video:
गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे