एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर सट्टाबाजाराचा अंदाज समोर; कोणाची सत्ता येणार?, महायुती की मविआ?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काही अंदाज वर्तवले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर आले असून नावाजलेल्या सात संस्थांपैकी पाच संस्थांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. याचदरम्यान, एक्झिट पोल व्यतिरिक्त सट्टा बाजारही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही करडी नजर ठेवून आहे. बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन बेटिंग बाजार यांनी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काही अंदाज वर्तवले आहेत.

बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजाराचा अंदाज काय?

बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजाराच्या अंदाजानूसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष आणि छोटे पक्षही आपली छाप सोडू शकतात, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. 

फलोदी सट्टा बाजारचा अंदाज काय?

आता फलोदी सट्टा बाजाराने महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीच्या निकालांविषयी भाकीत केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला 288 पैकी 144 ते 152 जागांवर विजय मिळू शकतो. महाराष्ट्रात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. तर महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर देईल, असा अंदाज आहे.  भाजपला 87 ते 90 जागा मिळू शकतात, असा फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी महायुतीवर 40 पैसे तर महाविकास आघाडीवर 2 ते 2.50 रुपयांचा भाव लागताना दिसत आहे. 

23 नोव्हेंबरलाच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार-

विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने 95 जागांवर निवडणूक लढवली होती. तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 81 जागा आल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये 9 जागा अधिक मिळाल्या होत्या. मात्र तरीदेखील उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे सरस ठरताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाला बहुतेक एक्झिट पोलमध्ये जास्त जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज असून 23 नोव्हेंबरलाच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. दरम्यान, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.11 टक्के मतदान झालं आहे. संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर मतदान 68 टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

संबंधित बातमी:

Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC : कराडांसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला रोहित कोण? धसांनी सर्व सांगितलंABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 09 AM 15 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सManoj Jarange On Walmik Karad : कराडवर मोकोका लावला आता 302 लावा, जरांगेंची मागणीVidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Embed widget