एक्स्प्लोर

पेटलेल्या बसमध्ये अडकलं साडे तीन तोळं सोनं; अग्निशमन दलाच्या जवानांची कमाल, अखेर प्रवाशाचा जीव भांड्यात

सदर शिवशाही बस ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरकडे रवाना होत होती, दरम्यान बसला आग लागल्याने प्रवाशांसह सर्वांचाच खोळंबा झाला.

ठाणे : कडाक्याच्या उन्हामुळे एकीकडे वातावरण तापलं असून प्रवाशांच्या अंगातून घामाच्या धारा निघत आहेत, त्यातच ठाणे (Thane shivshahi) स्टेशनवर शिवशाही बसला अचानक आग लागल्याने ही आग कशाने लागली याची चर्चा होत आहे. बसला आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. अग्निशमनच्या जवानांकडून (Fire Brigade) आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. मात्र, बसच्या खालील बाजूस इंजिन आणि डिझेल टाकीजवळ आग लागल्याने बसने पेट घेतला, त्यामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली. विशेष म्हणजे या बसमध्ये 15 प्रवासी होते, सुदैवाने प्रवाशांनी बसमधून धाव घेत आपली जीव वाचवला. मात्र, एका प्रवाशाचे साडे तीन तोळे सोनं (Gold) पेटलेल्या बसमध्ये अडकल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला होता. 

सदर शिवशाही बस ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरकडे रवाना होत होती, दरम्यान बसला आग लागल्याने प्रवाशांसह सर्वांचाच खोळंबा झाला. या दुर्घटनेत 15 प्रवासी बचावले, पण एका प्रवाशाची बॅग पेटलेल्या बसमध्ये अडकली होती. विशेष म्हणजे, बस जळून खाक झाल्यानतंरही या प्रवाशाचे सोनं वितळता वितळता राहिल्याने अनेकांना आश्चर्य वाटले, तर प्रवाशाचा जीव भांड्यात पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी संबंधित प्रवाशाला त्यांचं सोनं परत केल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त करत अग्निशमन दलाचे आभार मानले. एक महिला प्रवासी पुण्याहून वापीला जात होते, त्या महिला प्रवाशाचे साडेतीन तोळा सोनं बॅगमध्ये अडकले होते, जी बॅग बसमध्ये अडकली होती. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून ते सोनं जशास तसं त्यांना परत मिळालं.

दरम्यान, ही शिवशाही बस ठाण्यात आली, तिथून बोईसरला जाणार होती. मात्र, ठाणे स्टेशनजवळ आल्यानंतर बस अचानक बंद पडली. बंद पडल्यानंतर खालून आग लागल्याचं दिसून आलं. बसमध्ये एकूण 15 प्रवासी होते, आग लागल्याचे समजताच प्रवाशांनी बसमधून बाहेर धाव घेतल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. सध्या बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. तर, बस संपूर्णपणे जळून खाक झाल्यानंतर देखील प्रवाशाचं सोनं जैसे थे राहिल्याने प्रवाशालाही आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला.

सद्यस्थितीत सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत, सोन प्रतितोळा 1 लाख 56 हजारांवर पोहोचलं असल्याने सोन्याचे दागिने वापरणे किंवा प्रवासात ते जवळ बाळगणे धोकादायक ठरत आहे. वाढत्या चोरीच्या घटना आणि प्रवाशांची, महिलांची सुरक्षा देखील सोन्यामुळे चिंतेची बाब बनली आहे. 

हेही वाचा

Thane Shivshahi Fire: ठाणे स्टेशनवर 'शिवशाही'ला भीषण आग, बस जळून खाक; सुदैवाने बचावले 15 प्रवाशी

  

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Land Scam : कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
मुसळधार पाऊस, डोक्यावर प्लास्टिक, उघड्यावरच केले अंत्यसंस्कार, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा अभाव
मुसळधार पाऊस, डोक्यावर प्लास्टिक, उघड्यावरच केले अंत्यसंस्कार, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा अभाव

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget