एक्स्प्लोर

Thane Metro Railway: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रोच्या ट्रायल रनचा मुहूर्त ठरला, पहिला टप्पा कधी सुरु होणार?

वर्षाच्या अखेरीस ठाणे शहरातील मेट्रोचा पहिला टप्पा पूर्णत्वास येईल आणि गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मार्गावर मेट्रो नियमितपणे धावेल.

Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे मेट्रोचा पहिला ट्रायल रन लवकरच पार पडणार असून, त्यासाठी मुहूर्त नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी ठरवण्यात आला आहे. या खास कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. ट्रायल रनचा पहिला टप्पा घोडबंदर मार्गावरील गायमुख ते विजयनगरी दरम्यान असेल आणि त्याची लांबी सुमारे तीन ते साडेतीन किलोमीटर आहे. वर्षाच्या अखेरीस ठाणे शहरातील मेट्रोचा पहिला टप्पा पूर्णत्वास येईल आणि गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मार्गावर मेट्रो नियमितपणे धावेल. या मार्गावर एकूण दहा स्थानकं आहेत, जी प्रवाशांसाठी खूप महत्वाची ठरणार आहेत.

एमएमआरडीएच्या माहितीप्रमाणे, या मेट्रो मार्गिकेचा उपयोग ठाणे शहर आणि उपनगरांतील लाखो प्रवाशांसाठी होणार आहे. भविष्यात हा मार्ग मुंबईतील इतर मेट्रो मार्गांशी जोडला जाईल, ज्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होईल. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडुप आणि घोडबंदरकडे प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे. रोजच्या वाहतूक कोंडीमुळे होणारा वेळ बचत होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ट्रायल रनमध्ये समाविष्ट असलेली प्रमुख 10 स्थानके ही पुढीलप्रमाणे आहेत:

कॅडबरी

माजीवाडा

कपूरबावडी

मानपाडा

टिकुजी-नी-वाडी

डोंगरी पाडा

विजय गार्डन

कासरवाडावली

गोवानिवाडा

गायमुख

सध्या कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यानच्या सुमारे 10 किलोमीटर अंतरावर ट्रायल रनसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या तयारीमुळे ठाणेकरांमध्ये उत्सुकता वाढली आहे आणि ट्रायल रन प्रत्यक्ष पाहण्यासाठी नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.ठाणे मेट्रोच्या या पहिल्या टप्प्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. ट्रायल रन यशस्वी झाल्यानंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत सुरू होईल, ज्यामुळे प्रवाशांचे वेळेचे आणि प्रवासाचे मोठे फायदे होतील.

बीकेसी ते कफ परेड ‘सुपरफास्ट

मुंबईच्या दैनंदिन प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी भुयारी मेट्रो 3 ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बीकेसीसारखे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि मंत्रालय, सीएसएमटीसारखी सरकारी व ऐतिहासिक ठिकाणे आता थेट भुयारी मेट्रोमार्गे जोडली जाणार आहेत. एवढेच नव्हे, तर या प्रवासाचा कालावधी जिथे साधारण दीड तास लागतो, तो आता फक्त अर्ध्या तासात पूर्ण होणार आहे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra BJP : भाजप अॅक्शन मोडमध्ये, जिल्हा निवडणूक प्रभारींची यादी जाहीर
Pawar Politics: 'अजित पवारांवर फक्त नाराजी', काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांचे सूचक वक्तव्य
Uddhav Thackeray : 'एक अनर्थमंत्री, एक नगरभक्ती मंत्री, तिसरे गृहखलन मंत्री'
Mumbai Monorail Accident : मोनोरेलचा कारभार, अडचणींचा सिग्नल? Special Report
Pune Leopard : नरभक्षक बिबट्या ठार, पण दहशत संपणार कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Embed widget