ठाण्यात मोठी दुर्घटना, इमारतीची लिफ्ट कोसळून सहा जणांचा मृत्यू
ठाणे : ठाण्यातील बाळकुम येथे निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

ठाणे : ठाण्यातील बाळकुम येथे निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.
ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
