Thane: शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने भाजप पदाधिकाऱ्याला केली मारहाण
Thane Latest Crime News Todays: एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांच्या कार्यकर्त्यामध्ये ठाण्यात (Thane) मारहाण झाल्याचं समोर आले आहे.

Thane Latest Crime News Todays: एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांच्या कार्यकर्त्यामध्ये ठाण्यात (Thane) मारहाण झाल्याचं समोर आले आहे. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने भाजप पदाधिकऱ्याला मारहाण केल्याचं समोर आले आहे. या हल्यात भाजपचे प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले यांचा जमावासह भाजपा ठाणे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. संपूर्ण वादाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील भाजप वागळे मंडळ सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक यांच्याकडून हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कशिश पार्क येथे ही घटना घडली आहे. प्रशांत जाधव यांना त्वरित ठाण्याचा सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी प्रशांत जाधव यांचा जबाब नोंदवण्यासाठी वागळे पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला. जिल्हा रुग्णालया बाहेर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान, या हल्ल्यानंतर भाजप ठाणे यांनी ट्वीट केलं होतं. पण थोड्यावेळानंतर त्यांनी ट्वीट हटवलं आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील भाजप वागळे मंडळ सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक यांच्याकडून हल्ला करण्यात आला. आज संध्याकाळच्या सुमारास कशिश पार्क येथे ही घटना घडली असून जाधव यांना त्वरित ठाण्याचा सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राज्यात एकीकडे भाजप आणि शिंदे गटाचे सत्ता असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदासंघात भाजप पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने मारहाण केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.भाजपचे वागळे मंडळाचे सरचिटणीस प्रशांत जाधव हे आपल्या कामानिमित्त शुक्रवारी संध्याकाळी काशिश पार्क येथील जात असताना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ( शिंदे गटाचे ) माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी आपल्या साथीदारांसह मारहाण केली असल्याची तक्रार जाधव यांनी वागळे इस्टेट पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
ठाणे कशिश पार्क येथील भाजपा वागळे मंडळ पदाधिकारी श्री. प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला अजुन किती होणार असे हल्ले आणि किती सहन करायचे आहेत?
— ❤️Bablu❤️ (@shetkariporgo) December 30, 2022
ठाणे येथील भाजपा पदाधिकारी प्रशांत जाधव यांचा वर झालेल्या भ्याड हल्ला करणारे
— Ravindra vasant karngutkar (@ravindra_vasant) December 30, 2022
यांचा जाहिर निषेध भाजप ने जसास तसे उत्तर द्यावे अन्यथा ठाण्यातील भाजप संपेल वेळीच सावधान व्हा?
प्राणघातक हल्ला
— jagruti vichare (@JagrutiVichare) December 30, 2022
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नगरसेवक विकास रेपाळे,नम्रता भोसले यांचा जमावासह भाजपा ठाणे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला@BJP4India @narendramodi @Dev_Fadnavis @niranjandtweets@mieknathshinde @ThaneLive @BJP4Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
