Thane Police : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये पोलिस दलात सर्जिकल स्ट्राईक; एकाचवेळी एक पीआय, 39 अंमलदारांची उचलबांगडी!
एका व्हायरल व्हिडिओमध्ये या पोलिसांकडून शिळफाटा याठिकाणी अवजड वाहनांकडून अवैधरित्या वसुली करण्यात येत होती. हेच कारण देत या सर्वांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे पोलिस (Thane Police) दलात एकाच वेळी करण्यात आलेल्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. एका पोलिस निरीक्षकासह 39 अंमलदारांची वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या आदेशाने बदली करण्यता आली आहे. त्यांच्या जागी संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध कर्मचाऱ्यांची तात्पुरती बदली मुंब्रा वाहतूक उपविभागात करण्यात आली आहे. या प्रकारानंतर ठाणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे संपूर्ण उपविभागाची बदली होण्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयाने मुंब्रा वाहतूक उपविभागातील सर्वच्या सर्व अधिकारी आणि अंमलदार यांची ठाणे पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली झाली आहे.
व्हायरल व्हिडिओनंतर कारवाई
वाहतूक पोलिस उपायुक्तांनी इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यामागे व्हायरल व्हिडिओ आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये या पोलिसांकडून शिळफाटा याठिकाणी अवजड वाहनांकडून अवैधरित्या वसुली करण्यात येत होती. हेच कारण देत या सर्वांची मुख्यालयात बदली करण्यात आली असल्याचे ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या