एक्स्प्लोर

Shrikant Shinde On Aditya Thackeray :  वरळी, ठाणे की कल्याण? कुठून उभं राहायचे आहे आधी ठरवा; खासदार श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला

Shrikant Shinde On Aditya Thackeray : नेमकं कोणत्या मतदारसंघातून उभं राहायचं आहे हे आधी ठरवा, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

Shrikant Shinde On Aditya Thackeray :  आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे अशी चर्चा सुरू असताना यावरुन आता राजकारण तापले आहे. या मुद्द्यावर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपले मौन सोडले आहे. आदित्य ठाकरेंना नेमकं कुठून उभे राहायचे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित करत आव्हान दिले आहे. 

कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. डोंबिवलीत आयोजित आगरी महोत्सव कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की,  स्वप्न पाहणे यात काहीच गैर नाही. ज्यांना इकडे उभारायचं त्यांनी इकडे खुशाल उभं राहावं. ज्या ठिकाणी चांगली लढत हवी तर विरोधकही चांगला हवा. तरच लढाईला मजा आहे. मात्र, आधी कुठून उभे राहायचे हे आधी ठरवावे असा टोला शिेदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. वरळीतून उभं राहायचे की ठाण्यातून उभा राहायचे  की कल्याण मधून उभं राहायचं, हे आधी त्यांनी निश्चित करावं. दररोज इथून उभे रहायचे, तिथून उभे रहायचे अशी वेगवेगळी वक्तव्ये राजकारणात चालत नसल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. 

विरोधकांकडे छातीठोकपणे सांगण्यासारखी कामेच नाहीत

कल्याण डोंबिवलीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, मेट्रो, फ्लाय ओव्हर उभारणे हे आपले ध्येय असून कोणती कामे केलीत कोणती कामे सुरू आहेत आणि कोणती होणार आहेत हे मी छाती ठोक पणे सांगू शकतो मात्र विरोधकांची तितकी हिंमत नाही कारण त्यांच्याकडे छातीठोक पणे सांगण्यासारखी कामेच नाहीत,  असेही खासदार शिंदे यांनी म्हटले. विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काही दुसरे काम नाही म्हणूनच मी त्यांच्या टीकेकडे लक्ष देत नसल्याचे ही शिंदे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक का झाली नाही? संजय राऊतांची टीकाCity 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Full Speech : कोकणाचा आशिर्वाद पुन्हा महायुतीलाच मिळेल,फडणवीसांना विश्वास100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्स ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Embed widget