2012 पासून मोदींना शिवसेना फोडायची होती, पंतप्रधान पदासाठी मोदींचं कारस्थान; काँग्रेस नेत्याची परखड टीका
Kumar Ketkar On PM Narendra Modi : पंतप्रधान पदासाठी 2014 च्या आधीपासून मोदींचं कारस्थान, 2012 पासून शिवसेना फोडायची होती, अशी परखड टीका काँग्रेस माजी खासदार कुमार केतकर यांनी केली आहे.
ठाणे : मोदी (Narendra Modi) 2012 पासून शिवसेना (Shiv Sena) फोडणार होते, मोदींचा ठाकरे (Thackeray) यांच्या वरची खुन्नस 2012 पासून आहे, 2014 च्या आधीपासून पंतप्रधान पदाच्या (Prime Minister) उमेदवारीसाठी मोदींचं कारस्थान आहे, असं म्हणत काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ सभेत त्यांनी हा हल्लाबोल केला आहे.
2012 पासून मोदींना शिवसेना फोडायची होती
कुमार केतकर म्हणाले, मोदी-शाह महाराष्ट्र लुटून गुजरातला घेऊन जात आहेत. 2009 ला भाजपला इतक्या कमी जागा आल्या की, अडवाणींना काढून टाकावं लागलं. चार टप्पे मतदानाचे बाकी आहेत, मोदी काहीही करू शकतात. तुम्ही दिलेले मत भाजपला जाऊ शकतं. ठाकरे यांच्या वरची खुन्नस 2012 पासूनची आहे, मोदी 2012 पासून शिवसेना फोडणार होते. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मोदींचं कारस्थान 2014 च्या आधीपासून सुरु आहे. ही निवडणूक राजन विचारे आणि लोकशाही यांच्यात, नरेंद्र मोदी आणि फॅसिजम यांच्यात आहे, असं वक्तव्य कुमार केतकर यांनी केलं आहे.
एक चालक म्हणजे हुकूमशाही : जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनी या सभेत मोदी सरकार आणि भाजपवर टीका करत म्हटलं आहे की, मोदींना संविधनातील धर्मनिरपेक्षता काढून टाकायची आहे. मणिपूरच्या महिलांवर अत्याचार होताना तुम्हाला मंगळसूत्र आठवलं नाही. ब्रुजभूषन सिंह दोषी आहे, कोर्टाने त्याच्यावर खटला भरायला सांगितला. एक चालक देश चालवू शकत नाही, एक चालक म्हणजे हुकूमशाही. ठाण्यातली लढाई निष्ठावान विरुद्ध गद्दार आहे.
राजन विचारे काय म्हणाले?
ठाणे लोकसभा उमेदवार खासदार राजन विचारे म्हणाले, मी एकच सांगेन ही लढाई, राजन विचारेची नाहीय, उद्धव साहेबांचा नाही किंवा पवार साहेबांची नाही किंवा राहुल गांधींची नाही, इथे बसलेल्या सर्व आपल्या सर्वांची लढाई आहे आणि म्हणून तुम्ही माझ्याबरोबर दिवस-रात्र सर्व पक्षाचे कार्यकर्ते उन्हातानातून या ठिकाणी प्रचार करत असता. एकजुटीने या सबंध इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या सभा असतील किंवा प्रचार सभा असतील या सर्व आपण घेत आहोत. परंतु ही निवडणूक अभी नही तो कभी नही, अशी निष्ठावान आणि गद्दार, अशी आपली लढाई आणि या लढाईमध्ये आणि खऱ्या अर्थाने आपल्याला लढायची आहे. 20 तारखेला या मशाल चिन्हावरती बटन दाबून त्या ठिकाणी आपल्याला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून मला परत तिसऱ्यांदा या लोकसभेच्या खासदार म्हणून आपण मला संधी द्याल, असा विश्वास राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :