एक्स्प्लोर

पहलगाममधील हल्ल्यात वडील गेले, दहावीत उत्तम मार्कांनी पास झाला, डोंबिवलीतला ध्रूव जोशी म्हणाला, बाबा असते तर...

मंगळवारी जेव्हा ध्रुवचा निकाल लागला. 78 टक्के मिळवून दहावीचा महत्तवाचा टप्पा त्यानं पार केला. पण त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याचे वडील त्याच्या पाठीशी नसल्यानं ध्रुव व्याकूळ झाला होता.

Thane: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपले वडील गमावलेल्या डोंबिवलीच्या ध्रुव हेमंत जोशीने मंगळवारी जाहीर झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत 78 टक्के गुण मिळवले आहेत. "बाबा असते तर.." ही एकच भावना डोंबिवलीतील ध्रुव हेमंत जोशीच्या मनात सतत खोलवर घर करून बसली आहे. 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून जोशी कुटुंब अजूनही सावरलेले नाही. (Pahalgam Terror Attack)

10 वीच्या परीक्षेत घवघवीत यश

ध्रुव डोंबिवलीतील ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतो. परीक्षा संपल्यानंतर वडिलांनी त्याला आणि कुटुंबीयांना निसर्गरम्य सहलीसाठी काश्मीरला घेऊन जाण्याचं ठरवलं होतं. सहलीला पहलगाम येथे कुटुंबासोबत आनंद साजरा करत असताना 22 एप्रीलला संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.  पहलगाम येथे अचानक दहशतवादी हल्ल्यात ध्रुवचे वडील हेमंत जोशी, तसेच संजय लेले आणि अतुल मोने या डोंबिवलीतील आणखी दोन नागरिकांनी प्राण गमावले. या घटनेनंतर संपूर्ण डोंबिवली शहर हळहळून गेलं. ध्रुवसोबत ऋचा मोने हिचीही बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती. अभ्यासाचा तणाव उतरवण्यासाठी दोघांच्या कुटुंबांनी मिळून ही सहल ठरवली होती. मात्र काही क्षणातच सगळं आयुष्यच पालटून गेलं.

मंगळवारी जेव्हा ध्रुवचा निकाल लागला. 78 टक्के मिळवून दहावीचा महत्तवाचा टप्पा त्यानं पार केला. पण त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याचे वडील त्याच्या पाठीशी नसल्यानं ध्रुव व्याकूळ झाला होता. आपलं यश पहायला बाबा नाहीत ही भावना दाटून आली होती. त्यामुळेच कोणताही सत्कार, सेलिब्रेशन किंवा उत्सव त्याने नाकारला आहे.

दहावीचा निकाल जाहीर

राज्याचा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालातही कोकण विभागाने 99.01 टक्क्यांसह अव्वल ठरला आहे. तर 97.21 टक्क्यांसह मुलींनी यंदाही बाजी मारली आहे. 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान दहावीची परीक्षा झाली होती. यंदा 15 लाख 60 हजार 164 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 84 लाख 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हेही वाचा:

SSC Result 2024 : दहावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर; झटपट निकाल पाहण्यासाठी 'या' वेबसाईट्स फॉलो करा!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
BJP Leader Raj K purohit passes away: भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?

व्हिडीओ

Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
BJP Leader Raj K purohit passes away: भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Virat Kohli : कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
Ind vs Nz 3rd T20 Live Score : ‘सर जडेजा’चा सुपरमॅन अवतार! अविश्वसनीय कॅचनं उडवली न्यूझीलंडची झोप, प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
‘सर जडेजा’चा सुपरमॅन अवतार! अविश्वसनीय कॅचनं उडवली न्यूझीलंडची झोप, प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Embed widget