एक्स्प्लोर

Konkan MHADA Lottery 2023 dates : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या लॉटरी सोडतीचा मुहूर्त ठरला!

कोंकण मंडळातर्फे ५३११ सदनिका विक्रीसाठी २४ फेब्रुवारी रोजी ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे संगणकीय सोडत होणार आहे. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे.

MHADA Konkan Lottery result मुंबई :  म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर,रायगड, येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त २५०७८ पात्र अर्जांची संगणकीय सोडत शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी, २०२४  रोजी सकाळी ११.०० वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार्‍या या सोडतीला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री श्री. कपिल पाटील,   राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री श्री. शंभुराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त  मुख्य सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.  अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial या पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  वेबकास्टिंगची लिंक सोडतीच्या आदल्या दिवशी म्हाडाच्या  https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबूक पेजवर करण्यात  येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे.

विजेत्यांना SMS

सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६.०० वाजेनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे तसेच  विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.

सदर सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System)द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व अर्जदाराची पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास  सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ ठरल्यामुळे यंदाच्या वर्षी नागरिकांनी सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.  

५३११ सदांनिकांच्या विक्रीकरिता सोडत

दि. १५ सप्टेंबर, २०२३ रोजी कोंकण मंडळाच्या अखत्यारीतील ५३११ सदांनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली होती.  या सोडतीसाठी आतापर्यंत एकूण ३१८७१ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह २५०७८ अर्ज प्राप्त झाले आहेत. 

कोंकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० सदनिकांचा समावेश आहे. तसेच एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ सदनिका,  सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका आहेत. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २२७८ सदनिका आहेत. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेव्यतिरिक्त इतर सर्व योजनांकरिता २० टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.  

संबंधित बातम्या 

MHADA : म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला; स्वत:च्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सविस्तर जाणून घ्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget