एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

वाचन संस्कृती जपण्यासाठी कल्याणच्या कदम कुटुंबाचा पुढाकार, वाचनवेड्या कुटूंबाची प्रेरणादायी कहाणी 

Kalyan News : आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात भरकटलेल्या तरुण पिढीला तशी पुस्तकांची आवड फारशी नाहीच. मात्र तरुण पिढीला पुन्हा पुस्तकांशी जोडण्यासाठी कल्याणचं एक वाचनवेडं कुटूंब अनोखे प्रयत्न करत आहे.

Kalyan Latest Marathi News : आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात भरकटलेल्या तरुण पिढीला तशी पुस्तकांची आवड फारशी नाहीच. मात्र तरुण पिढीला पुन्हा पुस्तकांशी जोडण्यासाठी कल्याणचं एक वाचनवेडं कुटूंब अनोखे प्रयत्न करत आहे. पुस्तक वाचन हा एक असा संस्कार आहे जो वाचणाऱ्याचे केवळ आयुष्यच बदलत नाही तर त्याच्यामध्ये इतरांचे आयुष्य बदलण्याचीही ताकद आहे. मात्र आज इंटरनेटच्या जमान्यात तरुण पिढी पुस्तकांपासून दूर जात असून  कल्याणातील विशाल कदम यांचे अख्खं कुटूंब वाचन संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशाचे एक थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. या पार्शवभूमीवर कदम कुटुंबीयांचा हा प्रयत्न नक्की कौतुकास्पद आहे ...

करिअर मार्गदर्शक आणि समुपदेशक असणाऱ्या विशाल वसंत कदम यांना केवळ मुलांमध्ये नाही तर पालकांमध्येही वाचनाची कमी झालेली सवय ही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचे जाणवले. म्हणूनच त्यानी आपल्या घरापासून सुरुवात केली आणि  कुटुंबातील प्रत्येक सदस्याने  विशाल कदम यांना सक्रिय पाठिंबा दर्शवला. लोकांमध्ये पुस्तकं वाचनाची पुन्हा आवड निर्माण व्हावी यासाठी  दररोज सकाळी अर्धा तास सार्वजनिक ठिकाणी जाऊन एकत्रितपणे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र पुस्तक वाचन करतात. एवढेच नाही तर कोणी एखादा व्यक्तीने विचारणा केल्यास त्यालाही एक पुस्तक देऊन आपल्यामध्ये सहभागी करून घेतले जाते. दररोज नवी सकाळ,  नविन लोकं पण ध्येय मात्र एकच. वाचन संस्कृतीची जोपासना.  काय आहे की नाही कमाल या कुटुंबांची...? यामध्ये विशाल कदम यांचे वडील वसंत कदम, पत्नी सुदेष्णा कदम, मुलं बारा वर्षाचा कौशल कदम , नवू वर्षाचाविरज कदम आणि सहा वर्षांची मुलगी अभिन्या तसेच बंधु डॉ. वैभव कदम, त्याच्या शेजारी राहणाऱ्या अनिला खापरे असे सर्व जण आता या वाचन चळवळीमध्ये सहभागी होत आहेत. दररोज सकाळी अर्ध्या तासापैकी वीस मिनिटे पुस्तक वाचन आणि उर्वरित दहा मिनिटे हे सर्व जण एकमेकांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकाविषयी माहिती देतात. याबाबत सांगताना विशाल कदम यांनी मोबाईल दुष्परिणामातून बाहेर येण्यासाठी पुस्तकच मदत करणार असल्याचे ठाम पने सांगितल तसेच गेल्या काही वर्षात आपल्या हातातील पुस्तकांची जागा आधी टीव्हीच्या रिमोटने आणि आता मोबाईलने घेतलीय. पण टिव्हीच्या रीमोटपेक्षा मोबाईलचा विळखा इतका विखारी आहे की त्याचे लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या व्यक्तींवर प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होऊ लागले आहेत. त्याउलट पुस्तक वाचनातून मिळणारी प्रेरणा,ऊर्जा ही अत्यंत निर्मळ आणि तितकीच वाचकाची मनशक्ती वाढवणारी असते, अशी प्रतिक्रिया यावेळी विशाल कदम यांनी यावेळी व्यक्त केली. आज  मोबाईल आणि इंटरनेटच्या जगाशी पुस्तकांशी तुटलेले  नाते पुन्हा जोडले जावे यासाठी कल्याणचं एक वाचनवेडं कुटूंब करत असलेल्या प्रयत्नाचे शहरात कौतुक होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget