एक्स्प्लोर

महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशात पोलीस; विसर्जन मिरवणुकीवर 24 तास वॉच

लाडक्या बाप्पाची 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर त्याला निरोप देण्याचा दिवस जवळ आला आहे. उद्या 17 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात सकाळपासून विसर्जन मिरवणूक निघणार आहेत

ठाणे : गेल्या 10 दिवसांपासून सर्वत्र आनंदोत्सव घेऊन आलेल्या गणपती (Ganeshotsav) बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे. बाप्पांच्या निरोपासाठी गणेश मंडळांकडून तयारी केली जात असतानाच, पोलीस व प्रशासनाकडूनही यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा गणेश विसर्जन सोहळा आणि ईद-ए-मिलाद सण लागोपाठ आल्याने ठाणे पोलीस सज्ज झाले आहेत. दोन्ही सण शांततेत पार पडावी यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांच्या विशेष ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. ठाण्यात (Thane) बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर 9 हजार पोलिसांचा 24 तास वॉच असणार आहे. तसेच महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून मिरवणुकीत साध्या वेशातील पोलीस (police) देखील तैनात करण्यात येणार आहेत. 

लाडक्या बाप्पाची 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर त्याला निरोप देण्याचा दिवस जवळ आला आहे. उद्या 17 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात सकाळपासून विसर्जन मिरवणूक निघणार आहेत. गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी जिल्हा,ठाणे महापालिका आणि पोलिस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. यंदाच्या विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर ठाणे पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था पुर्णपणे मजबूत करण्यात आली आहे. जिल्ह्यात 35 हजार 623 हुन अधिक घरगुती तर 1 हजार 500 सार्वजनिक गणेश मूर्तीचा विसर्जन सोहळा संपन्न होणार आहे. 

ठाणे पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरणार

गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे हे स्वतः रस्त्यावर उतणार असून पाच परिमंडळातील चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, 9 डीसीपी, 18 एसीपी तसेच सुमारे 125 पोलिस निरीक्षकांवर सुरक्षेची कमान सोपविण्यात आली आहे. याशिवाय एसआरपीच्या 5 कंपन्या, 4500 पोलीस कर्मचारी, 700 होमगार्ड आणि एक कंपनी रॅपिड अक्शन फोर्स हे विसर्जनासाठी रस्त्यावर असणार आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील मुख्य नाक्या-नाक्यावर,चौका-चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.  

हालचालीवर सीसीटीव्हीची नजर

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत गणेश मुर्तींचे विसर्जन पूर्ण होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि संवेदनशील भागात हालचालीवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. विसर्जन सोहळ्यात कोणतीही आडकाठी आणू नये. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घेण्यास सांगितले आहे. महिला, बालके यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागाने घेतली आहे.

150 जणांना तडीपारीच्या नोटीसा

पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात पोलिसांनी तडीपाराची कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 150 हुन अधिक जणांना तडीपारीच्या नीटसा बजाविण्यात आल्या आहेत. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या वतीने संयुक्त मिशन तडीपारी ऑपरेशन राबवण्यात आले आहे.

अनंत चतुर्दशी गणेश विसर्जनासाठी ठाण्यात वाहतुकीत बदल

ठाण्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. अनंत चतुर्थीला ठाणे शहरात  सार्वजनिक आणि खाजगी गणेशाचे विसर्जन करण्यात येते. गणेश विसर्जनाच्या वेळी सार्वजनिक मंडळ ढोल-ताशे, डीजे च्या तालावर नाचत गाजत मिरवणूक काढीत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देतात. त्यामुळे शहरातील वाहतूक बाधित होते. ठाणेकरांना याचा त्रास होऊ नये म्हणून ठाणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात  आलेले आहेत. 

ठाणे शहरातील गणेशाचे विसर्जन हे साकेत, कळवा खाडी, आदी ठिकाणी करण्यात येणारे विसर्जनाच्या मिरवणूक या शहरातून जात असल्याने वाहतूक सुरळीत राहावी म्हणून वाहतुकीतील बदल कार्नाय्त आलेले आहेत. सदरचे वाहतूक बदल हे मंगळवार(ता-17 सप्टें) रोजी दुपारी 2 वाजल्यापासून रात्री गणेशाचे विसर्जन होईपर्यंत अमलात राहणार असल्याचे वाहतूक अधिसूचनेत नमूद कार्नाय्त आलेले आहे.

१- प्रवेश बंद :-साकेत विटावा तसेच कळवा नाकाकडून क्रिक नाका मार्गे सिडको कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना क्रीक नाका येथे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे...

पर्यायी मार्ग :- क्रीक नाका येथून कोर्ट नका मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा जांभळी नाका बाजारपेठ स्टेशन रोड मार्गे इच्छित स्थळी जातील..

२- प्रवेश बंद:- जीपीओ कोर्ट नाका येथून ठाणे रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे..

पर्यायी मार्ग:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून डावीकडे वळून जांभळी नाका बाजारपेठ स्टेशन रोड मार्गे एवंन फर्निचर मार्गे स्थळे जातील..

३- प्रवेश बंद:- चरई व सिविल हॉस्पिटल कडून टेंभी नाका कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनपा शाळा येथे प्रवेश बंद..

पर्यायी मार्ग:- कोर्ट नाका सर्कल इथून उजवीकडे वळून बाबासाहेब आंबेडकर चौक इथून डावीकडे वळून जांभळी नाका बाजार स्टेशन रोड मार्गे फर्निचर मार्गे येथून इच्छित स्थळे जातील..

४-प्रवेश बंद:- ठाणे स्टेशन कडून टॉवर नाका टेंभी नाका कडे जाणाऱ्या बसेस सह सर्व प्रकारच्या वाहनांना मूस चौक व टॉवर नका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे..

पर्यायी मार्ग:- ठाणे रेल्वे स्टेशन कडून सॅटिस ब्रिज वरून येणाऱ्या परिवहणच्या सर्व एसटी टीएमटी बसेस बी केबिन सॅटिस वरून गोखले रोड मार्गे जातील तसेच रिक्षा चार चाकी लहान वाहने सॅटिस ब्रिज खालून मूस चौक येथून सरळ टॉवर नका टेंभी नका मार्गे जातील..

सदर वाहतूक अधिसूचना पोलीस वाहने फायर ब्रिगेड रुग्णवाहिका गणेश मूर्ती विसर्जनातील वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Camp Vs MNS: मनसे हा मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष; अजितदादा गटाच्या नेत्याची बोचरी टीका
मनसे हा मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष; अजितदादा गटाच्या नेत्याची बोचरी टीका
J P Gavit : एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासनUlema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Camp Vs MNS: मनसे हा मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष; अजितदादा गटाच्या नेत्याची बोचरी टीका
मनसे हा मरण येत नाही म्हणून जिवंत असलेला पक्ष; अजितदादा गटाच्या नेत्याची बोचरी टीका
J P Gavit : एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
Satej Patil: महिलांची व्यवस्था करतो, याचा अर्थ काय? धनंजय महाडिकांच्या लाडकी बहीण योजनेबाबतच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
धनंजय महाडिकांची लाडक्या बहि‍णींना धमकी, महिला मतदानातून याचं उत्तर देतील; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Embed widget