Eknath Shinde on Uddhav Thackeray : इथे सर्व माझे सवंगडी आहेत, काही लोक सहकाऱ्यांना घरगडी समजतात; मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
Eknath Shinde on Uddhav Thackeray : इथे कोणीही छोटा नाही मोठा नाही. इथे घरगडी नाही तर सर्व सवंगडी आहेत. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे.
Eknath Shinde on Uddhav Thackeray : इथे कोणीही छोटा नाही मोठा नाही. इथे घरगडी नाही तर सर्व सवंगडी आहेत. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. पण काही लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाव न घेता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. ठाण्यात (Thane) शिंदे गटाच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्री झालो तरी माझ्यातील कार्यकर्ता मी जिवंत ठेवला आहे. आपण बाळासाहेब यांची भूमिका पुढे घेऊन जात आहोत. त्यासाठी धाडसी निर्णय घ्यावा लागला. तुम्ही माझ्यामागे आणि माझ्या आमदारांमागे उभे राहिला तर त्याबद्दल अभिनंदन. शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबवण्यासाठी आपण हा धाडसी निर्णय घेतला, असे शिंदे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
आपण घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नव्हतो
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, हे जगातील एकमेव उदाहरणं आहे कि सत्तेतून बाहेर होऊन आम्ही धाडसी निर्णय घेतला. बाळासाहेबांच्या विचारासाठी आम्ही हे धाडसी पाऊल उचलले. प्रत्येक युवा सैनिकाने एकनाथ शिंदे म्हणून काम करायचं आहे.कोविड काळात आपले सुद्धा परके झाले होते. तेव्हा सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत होतो. आपण घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नव्हतो. जनतेसाठी काम करत होतो, असही शिंदे यांनी नमूद केले.
युवा सेना मेळावा
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 24, 2024
🗓️ 24-02-2024📍ठाणे
https://t.co/vFYgCYU5ew
इथे घरगडी नाही तर सर्व सवंगडी आहेत
मी वीस वर्षांचा असताना शाखाप्रमुख झालो होतो. जेवढं काम तेव्हा करत होतो, आजही मी तेवढेच काम करतोय. कोणतं तिकीट मिळेल याच्यामागे न जाता फक्त काम करत राहा. इथे कोणीही छोटा नाही मोठा नाही. इथे घरगडी नाही तर सर्व सवंगडी आहेत. मी कधीही कुठल्याही पदाची मागणी केली नाही. मला न मागता दिघे साहेबांनी मला शाखाप्रमुख बनवलं. त्यामुळे न मागता आजपर्यंत मला मुख्यमंत्री सुद्धा बनवलं. तुमच्या प्रत्येक कामाची नोंद घेतली जाते, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या