एक्स्प्लोर

Dombivli News : विहिरीजवळ रील काढणं जीवावर बेतलं, ठाकुर्लीमध्ये विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू, 32 तासांनी मृतदेह सापडला

Dombivli News : विहिरीजवळ रील काढणे जीवावर बेतलेरील बनवताना तरुणाचा ठाकुर्ली पंपहाऊसमधील खोल विहिरीत पडून मृत्यू32 तासांच्या शोधकार्यानंतर सापडला तरुणाचा मृतदेह

Dombivli News : सोशल मीडियावर रील (Reel) काढून अपलोड करण्याचे फॅड आले. तरुणाईमध्ये रील किंवा व्हिडीओ बनवण्याची क्रेझ फारच जास्त आहे. अनेकदा हे रील्स बनवताना वादविवाद तर कधी अपघात झाले आहेत. असाच प्रकार डोंबिवलीजवळील (Dombivli) ठाकुर्लीमध्ये समोर आला आहे. ठाकुर्ली इथल्या पंपहाऊसमधील खोल विहिरीत (Well) पडून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिलाल सोहिल शेख असे खोल विहिरीत पडून मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मुंब्रा (Mumbra) इथला रहिवासी होता.

विहिरीजवळ रील बनवताना तोल गेला आणि...

बिलाल सोहिल शेह हा तरुण त्याच्या दोन मित्रांसह शनिवारी (10 जून) संध्याकाळी ठाकुर्ली इथल्या पंपहाऊस इथे रील काढण्यासाठी गेला होता. रील काढताना तोल जाऊन बिलाल खोल विहिरीत पडला. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. पंरतु, आजूबाजूला कोणीच नव्हते. या घटनेमुळे बिथरलेल्या दोन्ही मित्रांनी रेल्वे सुरक्षा बलाकडे धाव घेतली आणि त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने याबाबत विष्णूनगर पोलिसांना कळवलं. मग विष्णूनगर पोलिसांनी तात्काळ याची माहिती अग्निशमनन दलाला दिली. अग्निशमन विभागाच्या पथकाने या विहिरीत शोधकार्य सुरु केलं. तब्बल 32 तास शोधकार्य सुरु होते. अखेर सोमवारी (12 जून) संध्याकाळी बिलाल सोहिल शेखचा यांचा मृतदेह सापडला. अग्निशमन दलाच्या जवानांना त्याचा मृतदेह बाहेर काढला.

परभणीत दुचाकीवर रील बनवणं जीवावर, एकाचा मृत्यू

परभणीमध्ये काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला होता. दुचाकीवर रील तयार करणं विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं आहे. परभणीमध्ये 26 जानेवारी रोजी झेंडावंदनला एकाच दुचाकीवरुन जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा रील तयार करताना अपघात झाला होता. यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. झेंडावंदनाला जाताना 'मेला' या चित्रपटातील 'डर है तुझे किस बात का?' या गाण्यावर विद्यार्थी रील तयार करत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 

रील बनवल्याप्रकरणी महिला कंडक्टरचं निलंबन

रील बनवल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एका महिला कंडक्टरला निलंबित करण्यात आलं होतं. परवानगीशिवाय बस चालकाच्या सीटवर बसून व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला होता. यामुळे राज्य परिवहन विभागाची प्रतिमा मलीन झाली, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असं एमएसआरटीसीने सांगितलं होतं. मंगल गिरी असं त्यांचं महिला कंडक्टरचं नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारात त्या कार्यरत होत्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget