एक्स्प्लोर

डोंबिवलीत उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झालेला वृद्ध चेंबरमध्ये पडलाच नाही ? CCTV फुटेजमुळं प्रकरणात धक्कादायक खुलासा

घटनास्थळावरील दोन सीसीटीव्ही फुटेजमुळे मृत्यू मागचं खरं कारण स्पष्ट झालं असून वृद्ध इसमाचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झालाच नसल्याचे समोर येत आहे .

Dombivali : एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (21 जुलै) डोंबिवलीतील कल्याण शिळ रोड टाटा पॉवरजवळ घडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती . या प्रकरणी डोंबिवली एमआयडीसीच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना या घटनेत आता एक वेगळाच खुलासा झाल्याने सगळेच चक्रावले आहेत. घटनास्थळावरील दोन सीसीटीव्ही फुटेजमुळे मृत्यू मागचं खरं कारण स्पष्ट झालं असून वृद्ध इसमाचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झालाच नसल्याचे समोर येत आहे .

नेमका प्रकार काय ?

डोंबिवलीतील कल्याण शीळ रोड टाटा पॉवरजवळ एका वृद्ध इसमाचा एमआयडीसीच्या उघड्या चेंबर मध्ये पडून मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं .रस्त्याने चालत असताना इसमाचा पाय घसरला आणि तो उघडे असलेल्या चेंबरमध्ये पडला . यातच वृद्ध इसमाचा मृत्यू झाला असं सांगितलं जात होतं .बाबू धर्मा चव्हाण असे या मृत इसमाचे नाव आहे . मृत्यूनंतर परिसरातील लोकांनी डोंबिवली एमआयडीसीच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला होता . दरम्यान यंत्रणेवर ठपका ठेवत संताप व्यक्त होत असताना आता या प्रकरणात घटनास्थळाचे दोन सीसीटीव्ही समोर आल्याने मोठा खुलासा झाला आहे .  

सीसीटीव्हीमध्ये नेमकं काय ?

दोन वेगवेगळ्या अँगल मधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मृत इसम चेंबर मध्ये पडताना नाही तर चेंबरच्या बाजूला पडताना दिसत आहे .मिळालेल्या माहितीनुसार सदर इसम दारूच्या नशेत होता . दारूचा नशेत असताना चेंबरजवळ तू गेला आणि तोल जाऊन चेंबरच्या बाजूला पडल्याचं या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे . तसेच पहाटे चार च्या सुमारास घटनास्थळावरचा दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एका चोरट्याने चेंबरवरचं झाकण चोरून नेल्याचे देखील स्पष्ट दिसत आहे .परिणामी या भागातलं चेंबर उघडं होतं हे ही समोर आलं . आता वृद्ध इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे . 

चेंबर उघडं ठेवल्याने नागरिकांचा संताप

कल्याण पूर्वेकडील टाटा नाका गांधीनगर परिसरात एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमुळे बाबू धर्मा चव्हाण यांचा पाय  घसरल्याने ते उघड्या चेंबर मध्ये पडले . त्यामुळे त्यांना गंभीर इजा झाली व उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला असा दावा करण्यात आला होता .या भागातील चेंबर हे सातत्याने उघडे असतात असा आरोपही नागरिकांनी केला होता . मात्र या प्रकरणात समोर आलेल्या दोन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वृद्ध इसमाचा मृत्यू मागचा उलगडा झाला आहे.

राजकीय पक्षांनी उठवली प्रशासनावर झोड

वृद्ध इसमाचा चेंबर मध्ये पडून मृत्यू झाल्याची अफवा पसरतात काही राजकीय पक्षांनी एमआयडीसी प्रशासनावर टीका करत निषेध व्यक्त केला .प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला .मात्र सीसीटीव्ही कुठे हा प्रकार वेगळाच असल्याचं स्पष्ट झालं आहे . दरम्यान या प्रकरणी आता पोलिस अधिक तपास करत आहेत.

डोंबिवली MIDC चा गलथान कारभार, उघड्या चेंबरमध्ये पडून 60 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'

व्हिडीओ

Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report
Shinde Fadnavis on Uday Samant  उदय सामंत कुणाचे लाडके? शिंदेंचे की फडणवीसांचे? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग
Embed widget